Home आपलं जग करियर job crisis: कॅम्पस मुलाखतीनंतर पुढे काय? नोकरीची चिंता वाढली - job anxiety...

job crisis: कॅम्पस मुलाखतीनंतर पुढे काय? नोकरीची चिंता वाढली – job anxiety increased among engineering students


नीरज पंडित

करोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात देशभरात मंदीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम इंजिनीअरिंगची पदवी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांवर होणार आहे. कॉलेजांमध्ये कॅम्प्स प्लेसमेंटची सुविधा असूनही, ७६ टक्के पदवीधरांना नोकरी मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतोय. तसंच कॅम्पस निवड झालेल्या विद्यार्थ्यांसमोरही, पुढे काय? असं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

इंजिनीअरिंग आणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाला आलेल्या आणि काही महिन्यांपूर्वी कॅम्पस मुलाखती होऊन विविध कंपन्यांमध्ये निवड झालेल्या शेकडो विद्यार्थ्यांच्या नोकऱ्या करोनामुळे संकटात सापडल्या आहेत. आयआयटी मुंबईमधल्या विद्यार्थ्यांचीही अशीच परिस्थिती असून देश-विदेशातील अनेक कंपन्यांनी करोनासंकटामुळे विद्यार्थ्यांना प्रतिसाद दिला नसल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय. तर, करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर अनेक ठिकाणी नोकऱ्या उपलब्ध होतील, असं काही जाणकारांना वाटतंय. इन्क्युबेशन लॅब असलेल्या ब्रिजलॅब्जनं अलीकडेच एक सर्वेक्षण केलं. यात इंजिनीअर्सना ‘जॉब रेडी’ बनवण्यासाठी आवश्यक कौशल्यांतील तफावत भरून काढण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली. कॉलेजांमध्ये प्लेसमेंट विभाग असला, तरीही एक पंचमांशपेक्षा जास्त म्हणजे २४% विद्यार्थ्यांनीच त्याद्वारे नोकरी मिळण्यासाठी ते पात्र असल्याचं सांगितलं. म्हणजे तब्बल ७६% विद्यार्थ्यांकडे सध्या कोणतीही नोकरी नाही. इंजिनीअरिंगच्या विविध शाखांमधील विद्यार्थ्यांकडून हे ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आलं आहे.

सर्वेक्षणानुसार, ३५.४८% नोकरी शोधणारे इंजिनीअर्स वेळेवर नोकरी लागण्याबाबत चिंतेत आहेत. इच्छित पॅकेजपासून ते नोकरीच्या संधींचा स्रोत इथपर्यंत असंख्य विषयांविषयी त्यांना धास्ती आहे. विशेष म्हणजे प्रतिसाद दिलेल्यांपैकी २६.९६% पदवीधारकांनी, त्यांच्याकडे असलेल्या कौशल्यांच्या बळावर इच्छित पॅकेज मिळवता येईल, असा विश्वासही व्यक्त केला. करोना आणि त्या पार्श्वभूमीवर अंतिम परीक्षा आणि त्यामुळे निर्माण झालेला तिढा सुटण्यास वेळ लागला असल्यानं बहुतांश कंपन्यांनी निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि त्यांचे निकाल येईपर्यंत ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घ्यायला सांगितली आहे. तर तब्बल १५ टक्क्यांहून अधिक कंपन्यांनी कोणत्याही प्रकारचा निरोप दिला नसल्यानं कॅम्पस मुलाखतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांसमोर नोकरीचं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

IIT मुंबईचे क्लासरुम लेक्चर वर्षभरासाठी रद्द; फक्त ऑनलाइन शिक्षण

देशभरात पदवी परीक्षा होणार रद्द? लवकरच निर्णयाची शक्यता

सर्वच इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांच्या कॉलेजांमध्ये कॅम्पस प्लेसमेंटची सुविधा नाही. सध्याच्या आर्थिक मंदीमुळे भरती प्रक्रियेला अचानक विराम मिळाल्यानं ही स्थिती आहे. नोकरी शोधणाऱ्यांना अपेक्षित मोबदल्यासह लवकरच नोकरी मिळेल का याचा आत्मविश्वास नाही. यामुळे या काळात विद्यार्थ्यांनी एखादं कौशल्य विकसित करण्याची गरज आहे. जेणेकरून त्यांना या स्पर्धात्मक बाजारपेठेत प्रवेश मिळवता येईल.

नारायण महादेवन, सीईओ ब्रिजलॅब्जचेSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

mukesh ambani explosive case: मोठी बातमी! अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांचा तपास NIA करणार; हिरन मृत्यू प्रकरण ATS कडे! – mukesh ambani explosive case home ministry...

हायलाइट्स:मुकेश अंबानींच्या घराजवळील स्फोटक प्रकरण एनआयएकडेकेंद्रीय गृहमंत्रालयाचे आदेशमनसुख हिरेन प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसकडेमहाराष्ट्र गृह विभागाकडून निर्देशमुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील 'अँटिलिया' निवासस्थानाजवळ...

rajasthan: महिलेवर पोलीस ठाण्याच्या आवारात बलात्कार करणारा पोलीस सब इन्स्पेक्टर बडतर्फ – rajasthan alwar rape case accused si bharat singh sacked

हायलाइट्स:महिलेवर बलात्कार प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बडतर्फचार पोलीस कर्मचाऱ्यांविरोधातही कारवाईराजस्थानमधील अलवर जिल्ह्यात घडली होती घटनाअलवर: राज्यातील अलवर जिल्ह्यात खेडली पोलीस ठाण्याच्या परिसरात महिलेवर बलात्कार...

switzerland burka ban muslims: आणखी एका युरोपीयन देशात बुरखा बंदी ! ; मुस्लिम संघटनांचा नाराजीचा सूर – switzerland wants to destroy the identity of...

हायलाइट्स:स्वित्झर्लंडमधील जनमत चाचणीत ५१ टक्के लोकांचा बुरखा बंदीला पाठिंबास्वित्झर्लंडमधील मुस्लिम संघटनांची नाराजी, इस्लामिकफोबियातून निर्णय झाल्याचा आरोपस्वित्झर्लंडमध्ये बुरख्याच्या माध्यमातून इस्लामिक कट्टरतावादी राजकारण रुजू नये...

Recent Comments