Home महाराष्ट्र job in Maharashtra: खूशखबर! मुंबई विविध क्षेत्रांत ८ लाख नोकऱ्या; स्थानिकांना मोठी...

job in Maharashtra: खूशखबर! मुंबई विविध क्षेत्रांत ८ लाख नोकऱ्या; स्थानिकांना मोठी संधी – 8 lakh jobs available in mumbai maharashtra


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

लॉकडाउनमुळे मुंबईसह देशभरातील लाखो नागरिकांनी रोजीरोटी गमावली आहे. तर, हजारोंच्या नोकऱ्या गेल्या आहेत. दुसरीकडे सर्वांच्या हाताला काम देणाऱ्या मुंबईतच आता रोजगार बुडाल्याने परराज्यांतील लाखो कामगारांनी स्वराज्यांमध्ये परतण्यास सुरुवात केली आहे. मात्र, हीच महाराष्ट्रातील तरुणांसाठी संधी ठरणार आहे. मुंबईत विविध क्षेत्रांमध्ये आठ लाख रोजगार स्थानिकांसाठी उपलब्ध झाले आहेत.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. देशातील सर्वांत मोठे बंदरही मुंबईजवळच आहे. यामुळेच येथील सोने-चांदीचा व्यवसाय हा देशातील सर्वांत मोठ्या व्यवसायांपैकी आहे. देशातील ६५ टक्के व्यवसाय मुंबईत आहे. याच सराफा क्षेत्रात पश्चिम बंगाल, ओरिसा व उत्तर प्रदेशातील लाखो कारागीर कार्यरत आहेत. त्यांचा आकडा १० लाखांच्या घरात आहे. या १० लाखांपैकी ८० टक्के कारागीर पगारी आहेत. उर्वरित कारागीर गरजेनुसार काम करणारे आहेत. पगारदारांपैकी ७० टक्के अर्थात सुमारे ५.४० लाख कामगार परप्रांतीय आहेत. हे सर्व आता जवळपास गावी परतले आहेत. त्याजागी आता स्थानिक तरुणांना कामाची संधी आहे. त्यामुळे स्थानिकांनी आता रोजगारासाठी पुढे यावे, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले होते.

ऑल इंडिया जेम्स अॅण्ड ज्वेलरी डॉमेस्टिक कौन्सिलचे संचालक मदन कोठारी यांनी याबाबत सांगितले की, ‘सराफा व्यावसायदेखील लवकरच सुरू होऊ शकतो. निर्जंतुकीकरणाद्वारे दुकाने सुरू करण्यासाठी सराफा सज्ज आहेत. ही दुकाने सुरू झाल्यास रोजगाराची गरज भासणार आहे. पण सर्व कारागीर सध्या गावी गेले आहेत. त्यामुळे स्थानिकांना संधी आहेच.’ मुंबई आणि परिसरातील बांधकाम व्यवसायातदेखील परप्रांतीय मोठ्या संख्येने आहेत. मुंबई शहर आणि परिसरात या क्षेत्रात ७५ हजार बांधकाम मजूर नोंदणीकृत आहेत. तर ठाणे व नवी मुंबई परिसरातील हा आकडा ३५ हजार आहे. क्रेडाईशी संबंधित बांधकाम व्यावसायिकांनुसा, यापैकी ८० टक्के मजूर हे परप्रांतीय आहेत. त्यामुळे बांधकाम सुरू होताच या क्षेत्रात किमान १ लाख रोजगार असेल.

मुंबई ही तयार कपड्यांची मोठी बाजारपेठ आहे. जवळपास ८ हजार दुकानांसह यामध्ये ८० हजारांहून अधिक रोजगार गुंतला आहे. त्यात ८० टक्के कर्मचारी बाहेरील आहेत. ते आता गावी गेल्याने स्थानिकांना येथेही संधी आहे. मुंबई किरकोळ वस्त्रोद्योग असोसिएशन महासंघाचे सचिव शैलेंद्र तिवारी व हरेन मेहता यांच्यानुसार, ‘सध्या नोकरवर्ग सर्व गावी गेला आहे. यामुळे दुकाने सुरू झाल्यानंतरही रोजगार उपलब्ध नसेल. ती संधी स्थानिकांना असेल. मोठी दुकाने आधी सुरू होण्याची शक्यता आहे. त्यात २० ते २५ हजारांचा तरी रोजगार स्थानिकांसाठी उपलब्ध होऊ शकेल.’

– विविध क्षेत्रांमध्ये आठ लाख नोकऱ्या

– सराफा-बांधकाम उद्योगात सर्वाधिक रोजगार

क्षेत्र व नोकऱ्या

सराफा ५.४० लाख

बांधकाम १ ते १.१० लाख

कापड ७० ते ९० हजार

किरकोळ १ लाखSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Bill Gates: हे कसं घडलं? बिल गेट्स ठरले अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी! – bill gates became americas biggest farmer bought 242,000 acres land

वॉशिंग्टन: मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स हे अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी झाले आहेत. बिल गेट्स यांनी अमेरिेकेतील १८ राज्यांमधील दोन लाख ४२ हजार एकर...

What is Honey Trap?: Explainer: हनी ट्रॅप म्हणजे काय? – what does it mean by honey trap?

मुंबई: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेनं केलेल्या बलात्काराच्या आरोपानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. मुंडे हे विरोधकांच्या निशाण्यावर आले...

Anna Hazare: अण्णा हजारेंचं आंदोलन रोखण्यासाठी भाजपचे आटोकाट प्रयत्न; उचललं ‘हे’ पाऊल – bjp trying hard to stop anna hazare from agitation

अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपण आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितल्याने त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आता भाजपने पुढचे पाऊल टाकले आहे. कोणत्याही परिस्थितीत अण्णांचे...

Anthony Stuart: गोलंदाजांमध्ये अशी कामगिरी करणारा जगातील एकमेव खेळाडू; पाहा व्हिडिओ – australian cricketer anthony stuart only bowler to take a hat trick in...

नवी दिल्ली: वनडे क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत चार असे गोलंदाज झाले आहेत ज्यांनी पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक घेतली आहे. पण करिअरमधील अखेरच्या सामन्यात हॅटट्रिक घेण्याची...

Recent Comments