Home देश पैसा पैसा jobs in big companies: शहरात येण्याची गरज नाही; मोठ्या कंपन्या तुमच्या गावात...

jobs in big companies: शहरात येण्याची गरज नाही; मोठ्या कंपन्या तुमच्या गावात येणार! – city will not have to come for jobs big companies will reach villages,says uday kotak


नवी दिल्ली: करोना व्हायरस लॉकडाऊनमुळे देशातील काम करण्याची पद्धत बदलत आहे. वर्क फ्रॉम होम असेल किंवा ऑनलाइन मिटिंग अशा अनेक गोष्टी होत आहेत. यात आणखी एक मोठा बदल होणार आहे आणि तो म्हणजे नोकरी करण्यासाठी मोठ्या शहरात जाण्याची गरज लागणार नाही.

वाचा- या कंपनीसाठी करोना ठरले वरदान; उत्पन्न झाले दुप्पट!

देशातील एखाद्या मोठ्या कंपनीत नोकरी करायची असेल तर महानगरात जावे लागेल असा विचार सर्व जण करत. पण आता लवकरच ही परिस्थिती बदलणार आहे. स्वत:च्या गावात राहून मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी करणे शक्य होणार आहे. त्यामुळे गावातील लोकांना शहरात येऊन धक्के खाण्याची आणि झोपडपट्टीत राहण्याची गरज नाही. कारण या मोठ्या कंपन्या आता गावात येणार आहेत.

वाचा- गुंतवणूकदारांची लागली रांग; जिओमध्ये येणार आखाती पैसा!

भारतीय उद्योग महासंघाचे नवनियुक्त अध्यक्ष कोटक महिंद्र बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ उदय कोटक पत्रकारांशी बोलताना सांगितले की, यापुढे ग्रामीण भागातून शहरी भागात स्थलांतर होणार नाही. तर शहरी भागातून ग्रामीण भागात स्थलांतर केले जाईल. लोकांना आता त्यांच्या घराजवळ रोजगार मिळेल आणि ते कुटुंबासोबत राहू शकतील. त्यांना शहरातील झोपडपट्टीत रहावे लागणार नाही.

वाचा- झोप उडवणारी बातमी; डार्क नेटवर भारतीय आधार-पॅन कार्डची विक्री!

मोठ्या कंपन्या ग्रामीण भागात कारखाने सुरू करण्याचा गंभीरपणे विचार करत आहेत, असे उदय कोटक म्हणाले. सीआयआय या गोष्टीसाठी प्रोत्साहन देईल. सध्याच्या परिस्थिती सरकार सुधारणे संदर्भात पाऊल उचलत आहे. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधेवर काम केले जात असल्यामुळे येथे नोकरी करण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

वाचा- ७४ कर्मचारी झाले करोडपती; CEOचे पॅकेज ३९ टक्क्यांनी वाढले!

करोनामुळे देशातील लाखो कुशल लोक शहरातून गावात स्थलांतरीत झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण परिसरात कारखाने सुरू करणाऱ्यांना कुशल कामगारांची कमतरता जाणवणार नाही. गरज वाटली तर त्यांना प्रशिक्षण देता येईल.

लॉकडाऊनमुळे एक नवी गोष्टी शिकण्यास मिळाली ती म्हणजे वर्क फ्रॉम होम होय. काम करण्याची ही नवी पद्धत पुढे देखील उपयोगी पडणार आहे. गावात राहून वर्क फ्रॉम होम करात येऊ शकते. कारण प्रत्येक गावात ब्रॉडबॅड इंटरनेट पोहोचल्याचे कोटक म्हणाले.

एक रुपये वेतन घेणारे कोटक सीआयआयच्या अध्यक्षपदी

सीआयआय अध्यक्षपदी कोटक महिंद्र बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ उदय कोटक यांची निवड वर्ष २०२०-२१ साठी झाली आहे. त्यांनी मावळते अध्यक्ष आणि किर्लोस्कर सिस्टिम्सचे अध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांच्याकडून पदभार स्वीकारला. टाटा स्टीलचे सीईओ व व्यवस्थापकीय संचालक टी. व्ही. नरेंद्रन हे सीआयआयचे नवे प्रेसिडेंन्ट डेसिग्नेट झाले आहेत. महासंघाचे उपाध्यक्ष म्हणून बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांनी पदभार स्वीकारला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Nitish Kumar Returns On Adds With PM Narendra Modi – वादानंतर भाजपच्या जाहिरातींत पुन्हा अवतरले नितीश कुमार!

पाटणा :बिहार विधानसभा निवडणूक २०२० च्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडतंय. याच दरम्यान दुसरीकडे, बिहारचे मुख्यमंत्री हे पंतप्रधान नरेंद्र मोंदीसोबत जाहिरातींत पुन्हा...

Mumbai Local Train Update: लोकल सर्वांसाठी कधी सुरू होणार? ‘या’ मंत्र्याने दिले मोठे संकेत – We Will Take Decision On Starting Local Train Services...

मुंबईः करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यापासून मुंबई लोकलही सर्वसामान्यांसाठी बंद आहे. लॉकाऊनचे निर्बंध शिथील होत...

शिवसेना-भाजपला मिळाले सभापतीपद

म. टा. वृत्तसेवा, येथील महानगरपालिकेच्या स्थायी व महिला बालकल्याण समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया मंगळवारी ( दि २७ ) ऑनलाइन पद्धतीने...

Recent Comments