Home देश jp aiadmk alliance: भाजपसोबत युती कायम राहणार, शहांच्या दौऱ्यात AIADMK ची घोषणा...

jp aiadmk alliance: भाजपसोबत युती कायम राहणार, शहांच्या दौऱ्यात AIADMK ची घोषणा – bjp aiadmk alliance amit shahs visit to tamil nadu


नवी दिल्ली: तामिळनाडूत पुढच्या वर्षाच्या सुरवातीला विधानसभा निवडणुका ( tamil nadu election ) होणार आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपसोबत एआयएडीएमकेची ( bjp aiadmk alliance ) युती कायम राहील, अशी घोषणा मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या चेन्नई दौर्‍यादरम्यान ( amit shahs visit to tamil nadu ) केली. लोकसभा निवडणुकीत केलेली युती विधानसभा निवडणुकीसाठीही कायम राहील. आम्ही १० वर्षे सुशासन दिलं आहे. आमची युती २०२१ च्या निवडणुका जिंकेल. तामिळनाडू कायम पंतप्रधान मोदींना पाठिंबा देईल, असं मुख्यमंत्री पलानीस्वामी म्हणाले.

करोनो व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यात तामिळनाडू सरकारने केलेल्या उपाययोजनांचे अमित शहांनी कौतुक केले. तसंच केंद्राच्या क्रमवारीनुसार यावर्षी देशातील इतर राज्यांच्या तुलनेत तामिळनाडूमधील सरकार हे सर्वात चांगले आहे, असं अमित शहा म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारताने करोनाचा प्रादुर्भाव रोखला आहे. तर जागतील बलाढ्य देशांना मात्र संघर्ष करावा लागतोय. करोनाचा प्रादुर्भाव रोखल्याबद्दल मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पन्नेरसेल्वम यांचं शहांनी कौतुक केलं. तामिळनाडूमध्ये करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. तमिळनाडूने करोना संकटात गर्भवती महिलांची जी काळजी घेतली तेवढी इतर कुठल्याही राज्याने घेत नाही, असं शहा म्हणाले.

तामिळनाडूत ९ वर्षांहून अधिक काळापासून एआयएडीएमकेची सत्ता आहे. लोकसभा निवडणुकीत एआयएडीएमकेने डीएमकेला झटका दिला होता. आता विधानसभा निवडणुकीत डीएमकेला पुन्हा झटका देण्याची तयारी एआयएडीएमके सुरू केलीय.

PM मोदींच्या नेतृत्वात धाडसी सुधारणा, मुकेश अंबानींकडून कौतुक

लव्ह जिहादविरोधी कायदा; बिहारमध्ये भाजप-जेडीयूचे वेगळे सूर

२०११ च्या विधानसभा निवडणुकीत एआयएडीएमकेने डीएमकेचा पराभव केला तेव्हा. जे जयललिता यांनी पक्षाला शानदार विजय मिळवून दिला होता. यानंतर २०१६ मधील विधानसभा निवडणुकीत एआयएडीएमकेने पुन्हा डीएमकेचा पराभव करत मोठा विजय मिळवला होता.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sourav Ganguly Announced 5 T 20 Match – करोना काळात हा संघ येणार भारत दौऱ्यावर; BCCIकडून घोषणा

नवी दिल्ली: भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतल्यानंतर इंग्लंडविरुद्ध कसोटी,वनडे आणि टी-२० मालिका खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने...

Recent Comments