Home देश Jyotiraditya Scindia: ज्योतिरादित्यांची कथित ऑडियो क्लिप व्हायरल, '५० लाखावर होतेय चर्चा' -...

Jyotiraditya Scindia: ज्योतिरादित्यांची कथित ऑडियो क्लिप व्हायरल, ‘५० लाखावर होतेय चर्चा’ – jyotiraditya scindia audio clip viral


ग्वाल्हेरः मध्य प्रदेशात कथित ऑडिओ क्लिपवरून राजकारण सुरू झालं आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यानंतर आता भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदेंची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होतेय. या व्हायरल क्लिपमध्ये उमेदवारीसाठी ५० लाख रुपयांच्या देण्या-घेण्यावर चर्चा सुरू आहे. ही व्हायरल ऑडिओ क्लिप विधानसभा निवडणुकीच्या वेळची आहे, असं सांगण्यात येतंय. पण या कथित ऑडिओ क्लिपबाबत अधिकृतपणे कुणी दुजोरा दिलेला नाही. ‘नवभारत टाइम्स’ने हे वृत्त दिलं आहे.

व्हायरल झालेल्या या कथित ऑडिओ क्लिपमधील अनिता जैन नावाच्या महिलेने अशोकनगरमधून उमेदवारीची मागणी केली होती. पण अशोकनगर येथून तिला उमेदवारी नाकारण्यात आली. अग्रवाल नावाच्या एका व्यक्तीला ५० लाख रुपये दिल्याचं ही महिला सांगतेय. ऑडिओच्या सुरुवातीला अनिता या आधी ज्योतिरादित्य शिंदेंना नमस्ते करतात. त्यानंतर यावेळी आपण तुमच्यासाठी काही करू शकलो नाही, असं ज्योतिरादित्य शिंदे त्यांना सांगतात.

महिला रडू लागते

समाजातून आपल्याला मोठा पाठिंबा आहे. निवडणुकीसाठी आपण पूर्ण तयारी केलीय. अशोकनगर जागेवर दुसऱ्या दावेदाराबाबत ही महिला वाईट बोलते. हा उमेदवार जिंकणार नाही. त्याला खूप विरोध आहे. उमेदवारीसाठी अनिता या ऑडिओमध्ये रडत आपली बाजू मांडत आहेत.

व्हायरल ऑडिओ क्लिपवरून मध्य प्रदेशात राजकारण रंगलं आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थकांनी ही क्लिक बनावट असल्याचं म्हटलं आहे. तर आपलं नाव सर्वेमध्ये होतं. उमेदवारीसाठी आपण ज्योतिरादित्यंना फोन केला होता. आपण फोनवर बोलत असताना अनेक जण तिथे उपस्थित होते. मला रडू आलं आणि फोन ठेवून निघून गेले. तिथे उपस्थित असलेल्या कुणीतरी ऑडिओ क्लिप बनवली पक्षाला पाठवली. पण आपण दिलेले पैसे मात्र आपल्याला परत मिळालेत, असं अनिता जैन या महिलेने एका वृत्तपत्राला सांगितलं.

करोना संकटाला संधीत रुपांतरित करण्याची हीच वेळ; मोदींचे आवाहन

क्रूरतेचा कळस गाठला! चारा खाल्ला म्हणून बछड्याला मरेपर्यंत मारलं

मध्य प्रदेश युवक काँग्रेसने यावरून टीका केलीय. ‘यह श्रीअंत का चाल, चरित्र और चेहरा है’, असं युवक काँग्रेसने म्हटलंय. मात्र या ऑडिओ क्लिप बाबत अधिकृतपणे कुणीही दुजोरा दिलेला नाही.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

L&T Construction Awarded Mega Contract : बुलेट ट्रेन प्रकल्प सुस्साट; ‘लार्सन अँड टुब्रो’ला मिळाले कंत्राट – l&t construction awarded mega contract to build india’s...

मुंबई : 'एल अँड टी'च्या बांधकाम विभागाने भारतातील आपल्या हेवी सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर व्यवसायासाठी नॅशनल हाय- स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी (एनएचआरसीएल) मोठे कंत्राट मिळवले...

…चहावाला निघाला सट्ट्याचा ‘बुकी’

म. टा. प्रतिनिधी, दुबई येथे सुरू असलेल्या '' सामन्यावर सट्टा लावणाऱ्या ''ला सिडको पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचे नाव सत्यनारायण मुंदडा (४०, रा. सिडको)...

Suryakumar Yadav: IPL 2020: सूर्यकुमारला मिळू शकते का भारतीय संघात स्थान? पाहा प्रशिक्षक रवी शास्त्री काय म्हणाले… – ipl 2020: indian head coach ravi...

आबुधाबी: मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादव हा चांगल्या फॉर्मात आहे. गेल्या २-३ आयपीएलपासून सूर्यकुमार सातत्याने चांगली फलंदाजी करताना दिसत आहे. त्यामुळे यावेळी जेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या...

Recent Comments