Home मनोरंजन kalpak pathak: मराठमोळ्या सिनेमॅटोग्राफरनं आयफोनवर शूट केला हॉलिवूड चित्रपट - marathi young...

kalpak pathak: मराठमोळ्या सिनेमॅटोग्राफरनं आयफोनवर शूट केला हॉलिवूड चित्रपट – marathi young filmmaker shoots film on iphone during pandemic in us


मुंबई: एका मराठमोळ्या तरुण सिनेमॅटोग्राफरनं अमिरेकेत अनेक आपल्या नावावर केले आहेत. इतकंच नव्हे तर चित्रपट निर्मितीत त्यानं एक वेगळाच प्रयत्न केलाय. गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकितही लॉकडाउन होता. या काळात त्यानं संपूर्ण चित्रपटाचं शूटिंग आयफोनवर केलं आहे. त्यानं शूट केलेल्या या चित्रपटाची सध्या चर्चा सरू असून ‘अॅमिडस्ट माय ओन’ असं या हॉलिवूड चित्रपटाचं नाव आहे.

‘सध्या करोनाच्या सावटामुळं चित्रपटनिर्मिती क्षेत्रातही मोठे बदल झाल्याचं पाहायला मिळत आहेत. चित्रपटाचं बजेट कमीत कमी कसं करता येईल, याकडं निर्मित्यांचं लक्ष आहे. त्यामुळं आयफोनवर चित्रपटाचं शूटिंग करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. करोनामुळं हॉलिवूडमध्ये देखील अनेक बदल करण्यात आले असून आयफोन हा लो बजेट चित्रपटांचं भविष्य असणार आहे’, असं कल्पक म्हणतो.


‘अॅमिडस्ट माय ओन’ या चित्रपटाचं काम २७ जानेवारी पासून सुरू करण्यात आलं होतं. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचंही कल्पकनं सांगितलं आहे. एक भारतीय ड्रायव्हर त्याच्या मालकाच्या गर्लफ्रेंडच्याच प्रेमात पडतो, अशी या चित्रपटाची कथा आहे’,असं, कल्पक सांगतो. आयफोनवर शूटिंग करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं कल्पक सांगतो. त्यामुळं त्याला काही अडचणीही आल्याचं त्यानं सांगितलं.

कल्पकनं आतापर्यंत अनेक पुरस्कार पटकावले असून नुकताच त्यानं ‘ब्लॅक आउट’ या शॉर्ट फिल्मसाठी न्यूयॉर्क सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार जिंकला आहे. तसंच ‘आयएम ओके’ (आणि नॉयदर आर यू) ‘या डॉक्युमेंट्री फिल्मसाठी कॅमेरा ऑपरेटर म्हणून काम केलं होतं. त्या डॉक्युमेंट्रीला प्रतिष्ठित अशा ‘बाफटा’कडून अनुदान मिळालं होतं.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Bihar election: संयमाची लस टोचा – editorial on bihar election 2020 and bjp promises free covid vaccine to people

विधानसभेच्या निवडणुका होत असलेल्या बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात सर्वांना करोनाची मोफत लस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देऊन, सगळी नैतिकता खुंटीला...

nashik vegetable market: भाजीबाजाराचे लिलाव पुन्हा स्थगित – auction of vegetable market postponed again in nashik

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवरजवळ नव्याने तयार करण्यात आलेल्या भाजी मार्केटमधील १४५ विक्रेत्यांना ओटे वाटपासाठी २२ ऑक्टोबर रोजी चिठ्ठी...

Recent Comments