Home मनोरंजन Kanagna Ranaut Shares Alia Bhatt Sonakshi Sinha Sonam Kapoor Childhood Photos -...

Kanagna Ranaut Shares Alia Bhatt Sonakshi Sinha Sonam Kapoor Childhood Photos – ‘आणि म्हणे हे गुड लुकिंग आहेत’, कंगनाने शेअर केले स्टार किड्सचे फोटो


मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर पुन्हा एकदा घराणेशाहीचा मुद्दा बोलला जात आहे. सोशल मीडियावर #पापाहैना हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे. अनेकजण घराणेशाही आणि बाहेरून आलेल्या कलाकारांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल बोलत आहेत. यादरम्यान एका युझरने आलिया भट्ट, सोनम कपूर, सोनाक्षी सिन्हा आणि सारा अली खान यांचे जुने फोटो शेअर केले.

स्टारच्या लहानपणीचे फोटो रिट्वीट करताना कंगनाने लिहिले की, ‘काही लोकांना वाटू शकतं की मी बॉडी शेमिंग करत आहे. पण असं नाहीये. हे मूव्ही माफियांना फक्त सत्य दाखवणं आहे. करण जोहरसारखे लोक जेव्हा बोलतात की आउटसायडर जर स्टार किड्स एवढे सुंदर दिसत नाहीत तर ती त्याची चूक नाही. लोकांनी आता यावर विचार करणं गरजेचं आहे.’

शशांक केतकरने पाहूनही ओळख दाखवली नाही, अभिनेत्याने दिलं उत्तर

या फोटोंमध्ये आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा आणि सारा अली खान दिसत आहेत. हे सर्व फोटो स्टार किड्सच्या लहानपणीचे आहेत. सिनेसृष्टीत आल्यानंतर त्यांच्या लुकमध्ये मोठा बदल झाला. कंगनाने त्यांच्या याच मेकओव्हरवर आपली प्रतिक्रिया दिली.

काही दिवसांपूर्वी कंगनाने सुशांतसिंहच्या आत्महत्येबद्दल बोलताना ती हत्या असल्याचं सांगितलं होतं. कंगनाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं की, ‘सुशांतसिंह राजपूतच्या हत्येनंतर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. मी काही मुलाखती वाचल्या आणि काही लोकांशी बोलले. त्यांच्या वडिलांनी सांगितलं की सिनेसृष्टीतील काही गोष्टींमुळे तो चिंतेत होता.’ यानंतर कंगना म्हणाली की, ‘तुम्ही कधी स्टार किड्सबद्दल असं लिहिलेलं वाचलं आहे का? असा अन्याय जेव्हा तुमच्या मुलांसोबत होईल तेव्हा तुम्हाला या गोष्टीची जाणीव होईल.’

हृदय पिळवटून टाकणारा क्षण; सुशांतच्या वडिलांचा फोटो करतो हताश

दरम्यान, अभिनेता शेखर सुमन यानं ट्विट करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. शेखर सुमन यानं ट्विट केल्यानंतर त्याचं हे ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे. सुशांतनं आत्महत्या केली असेल तर त्यानं एखादी चिठ्ठी नक्कीच लिहून ठेवली असले, असं त्यानं त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. ‘प्रचंड इच्छाशक्ती आणि हुशार असलेल्या सुशांतनं आत्महत्या केली असेल तर त्यापूर्वी त्यानं एखादी चिठ्ठी किंवा पत्र लिहून ठेवलं असतं,इतरांप्रमाणं माझ्या डोक्यातही तेच सुरू आहे. परिस्थिती दिसतेय त्यापेक्षा वेगळीही असू शकते’ असं त्यानं त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळं प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली आहे.

यापूर्वी देखील शेखरनं सुशांतच्या आत्महत्येसंदर्भात ट्विट केलं होतं. ‘सुशांतच्या चाहत्यांचा आक्रोश पाहून सिनेइंडस्ट्रीतले वाघ घाबरून लपले आहेत’, असं त्यानं त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. इतकंच नाही तर त्यानं #justiceforSushantforum. ही मोहिम देखील सुरू केली आहे.

सुशांतसिंहचा शेवटचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला

दरम्यान,बिहारमधील पाटण्यात राहणारे सुशांतसिंह राजपूत याचे कुटुंबीय देखील हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचं मानत नाहीत. ‘आम्हाला वाटत नाही की तो आत्महत्या करेल. पोलिसांनी या प्रकरणाचा खोलवर तपास करायला हवा. सुशांतच्या मृत्यूमागं कारस्थान असल्याचं दिसतं. त्याचीही हत्या देखील झालेली असू शकते, असं सुशांतच्या मामांचं म्हणणं आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Adesh Bandekar Selected As Brand Ambassador Of Matheran – आदेश बांदेकर बनले माथेरानचे ब्रँड अॅम्बॅसेडर; नेमकं काय करणार? | Maharashtra Times

म. टा. प्रतिनिधीमहाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानचे ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून सिद्धीविनायक न्यासाचे अध्यक्ष आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांची निवड करण्यात आली...

Recent Comments