Home मनोरंजन Kangana Ranaut: जॉर्ज फ्लॉइड हत्येचा निषेध करणारे बॉलिवूड कलाकार साधूंच्या हत्येवर गप्प...

Kangana Ranaut: जॉर्ज फ्लॉइड हत्येचा निषेध करणारे बॉलिवूड कलाकार साधूंच्या हत्येवर गप्प होते: कंगना रनौट


मुंबई: कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइड या व्यक्तीच्या मृत्यूनंतर अमेरिकेत जोरदार आंदोलने सुरू आहेत. जॉर्जच्या मृत्यूचे पडसाद संपूर्ण अमेरिकेत उमटले असून तीव्र आंदोलन सुरू आहेत. या घटनेवर जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात मत व्यक्त करत ‘Black Lives Matter’ या माहिमेला पाठिंबा दिला आहे. या मुद्द्यावर अभिनेत्री कंगना रनौट हिनं या माहिलेमा समर्थन देणाऱ्या कलाकारांवर निशाणा साधला आहे.

कंगनानं एका खासगी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत अमेरीकेतील वर्णद्वेषविरोधी आंदोलनावर मत व्यक्त केलं. अनेक मुद्द्यावर ती बोलली. अमेरिकेतल्या जॉर्ज फ्लॉयड यांच्या हत्येचा निषेध करताना भारतात काय झालं हे लोकांना माहित नसतं असं तिनं म्हटलं आहे. ‘गेल्या महिन्यांत महाराष्ट्रात दोन साधूंची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी बॉलिवूडचा एकही सेलिब्रेटी मत व्यक्त करण्यासाठी पुढं आला नव्हता. आता जॉर्ज फ्लॉयड यांच्या हत्येचा सर्वजण निषेध व्यक्त करतायत’ , असं कंगना म्हणाली.

बॉलिवूडमधल्या सेलिब्रिटींच्या दुटप्पी विचारसरणीचा तिनं समाचार घेतला. बॉलिवूडच्या अनेत सेलिब्रेटींना प्रसिद्धी मिळवण्यासाठी हॉलिवूडची नक्कल करण्याची सवय आहे. हे सर्व खरं तर खूप लज्जास्पद आहे. अजूनही ते इंग्रजांना फॉलो करतात, इतक्या वर्षानंतरही त्यांची गुलामगिरीच सवय काही गेली नाहीए’, असं म्हणत कंगनानं बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना टोला लगावला आहे.


अमेरिका: वर्णद्वेषविरोधी आंदोलनाला ट्रम्प यांच्या मुलीचा पाठिंबा
युवा पर्यावरण रक्षक ग्रेटा थनबर्ग हिचं कौतुक करण्यात बॉलिवूड सेलिब्रिटी व्यग्र असतात पण पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्यावर भारतातील अनेक लोकांचं काम खूप मोठं आहे, काहींना पद्मश्रीदेखील मिळालं आहे. कारण त्यांच्या मते साधू किंवा आदिवासी इतके आकर्षक किंवा ग्लॅमर असलेले नाहीत,’ त्यामुळं परदेशातील व्यक्तींना समर्थन देण्यापूर्वी आपल्या देशातील लोकांना जवळ करा, असं कंगनानं म्हटलं आहे.

राजकारणात बिलकूल रस नाहीए: सोनू सूद

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

e vehicle may be delay due to corona: करोनाचे संकट; ई-वाहनांना लागणार ब्रेक – e-vehicles will be delayed

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : सन २०३० पर्यंत संपूर्ण देशात ई-वाहने रस्त्यांवर चालवली जातील, हा केंद्र सरकारचा संकल्प अयशस्वी ठरण्याची शक्यता आहे. करोनाचे संकट...

Marathwada : २४ तासांत आढळले ५८५ नवे करोनाग्रस्त

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद मराठवाड्यात एका दिवसात आढळणाऱ्या बाधितांच्या संख्या कमी होत असून, गुरुवारी (२३ ऑक्टोबर) विभागाातील आठही जिल्ह्यांत ५८६ नवीन बाधित आढळले...

Recent Comments