Home मनोरंजन kannada actress suicide video: लाइव्ह व्हिडिओ करून अभिनेत्रीने प्यायलं विष, केली आत्महत्या...

kannada actress suicide video: लाइव्ह व्हिडिओ करून अभिनेत्रीने प्यायलं विष, केली आत्महत्या – kannada actress chandana committed suicide in a live video


कन्नड भाषिक टीव्ही अभिनेत्री चंदनाने विष पितानाचा लाइव्ह व्हिडिओ रेकॉर्ड करत आत्महत्या केली. चंदनाने प्रियकरावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. २९ वर्षीय चंदनान आत्महत्येपूर्वी व्हिडिओमध्ये स्पष्ट म्हटलं की तिचा प्रियकर दिनेशने तिला दगा दिला तसेच लग्नाचं वचन देऊन त्याने शारीरिक आणि आर्थिक छळ केल्याचं तिने सांगितलं. चंदनाने २८ मे रोजी आत्महत्या केली पण तिच्या मृत्यूची बातमी १ जून रोजी समोर आली.

मीडिया रिपोर्टनुसार, चंदना आणि दिनेश दोघंही गेल्या पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. चंदनाने आत्महत्येला दिनेशला जबाबदार ठरवतं त्याने चंदनाकडून पैसे उधार घेतले होते आणि अनेक महिन्यांपासून तिला भेटतही नव्हता. याशिवाय दिनेशचे इतर अनेक मुलींसोबत संबंध असल्याचा आरोप चंदनाने केला. एवढंच नाही तर चंदना गरोदरही होती आणि दिनेशने तिच्याकडून ५ लाख रुपये घे उधार घेतले होते. यानंतर मात्र त्याने लग्नाला नकार दिला.

विशेष म्हणजे चंदनाच्या कुटुंबियांना दोघांच्या नात्याबद्दल माहीत होते. चंदनाने सांगितले की, जेव्हा लग्नाच्या बोलणीसाठी तिचं कुटुंब दिनेशच्या घरी गेलं तेव्हा त्यांना अपमानीत करण्यात आलं. दिनेशचं लग्न चंदनासोबत नाही तर दुसऱ्या मुलीसोबत होईल असं चंदनाच्या पालकांना सांगण्यात आलं. चंदनाच्या आत्महत्येनंतर दिनेशच तिला इस्पितळात घेऊन गेला होता. पण उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला. यानंतर दिनेश इस्पितळातून पळून गेला. सध्या पोलिसांनी दिनेश आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात एफआयआर दाखल केली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jameel shaikh murder: Jameel Shaikh Murder: जमील शेख हत्या: शूटर्सना ‘त्याने’ कारमधून मालेगावात सोडले आणि… – jameel shaikh death shooters went to malegaon in...

ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी शाहिद लायक शेख (३१) या आरोपीला...

Recent Comments