Home मनोरंजन karan johar kids videos : ... म्हणून करण जोहरने मागितली चाहत्यांची माफी...

karan johar kids videos : … म्हणून करण जोहरने मागितली चाहत्यांची माफी – karan johar son yash johar says his dad is boaring


मुंबई: करोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सध्या जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. देशातही रुग्णांचा आकडा वाढतो आहे. संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारद्वारे लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या दरम्यान शुटिंग रद्द असल्यानं सिनेसृष्टीतील मोठे सेलिब्रिटी देखील घरी बसून आहेत.

ते स्वतः तर घरी राहतच आहेत शिवाय चाहत्यांनाही घरात बसण्याचा सल्ला ते वेळोवेळी देत आहेत. बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर हा देखील कुटुंबियांसोबत घरीच आहे. या दरम्यान तो त्याच्या मुलांसोबतच्या गमती- जमती चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करत असतो. पण यासाठी त्यानं आता चाहत्यांची माफी मागितली आहे.

करणनं ट्विटरवर एक व्हिडिओ रिट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये करोनामुळं अनेकांच्या आयुष्यात काय-काय नकारात्मक बदल झाले, कोणी काय सहन केलं हे दाखवण्यात आलं आहे. यादरम्यान अनेक सेलिब्रिटी त्यांचे लॉकडाऊन व्हिडिओ शेअर करताना दिसत आहेत. डॉक्टर आणि कर्मचारी त्यांच्या समस्यांबद्दल बोलताना दिसतात. तर एका व्यक्तीची नोकरी गेली आहे. तो म्हणतो ती, सेलिब्रिटी जशी घरात मजा-मस्ती करतायेत तशी मलाही करता आली पाहिजे. एकंदर लॉकडाऊन हा सर्वांसाठी सारखा नसतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.


ट्विटरवरचा हा व्हिडिओ पाहून करण देखील भावनीक झाला. ‘हा व्हिडिओ पाहून मला देखील त्रास झाली. मी शेअर केलेले व्हिडिओ देखील अनेकांसाठी असंवेदनशील असू शकतात. या बद्दल मी माफी मागतो. हे करण्यामागं माझा कोणताही हेतू नव्हता’, असं करणनं म्हटलं आहे.

मालिकेतली आसावरी खऱ्या आयुष्यातही आहे सुगरण

करण सध्या जास्तीत जास्त वेळ यश आणि रुही यांच्यासोबत घालवत आहे. लॉकडाउनमुळे त्याला कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली. रुही आणि यशसोबत खेळताचे व्हिडिओ तो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

कॅन्सरमधून बचावलेल्या रवी जाधवच्या मुलाला मिळालं हृदयस्पर्शी सरप्राइज

करण जोहरचा मुलगा बोलतो, ‘बाबा फार बोअर आहे’

Loading

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

priyam gandhi book: सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादीचा भाजपला होता पाठिंबा? नवाब मलिकांनी केला खुलासा – nawab malik attacks on bjp over priyam gandhi book

मुंबईः प्रसिद्ध लेखिका प्रियम गांधी यांनी महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या नाट्यावर लिहलेल्या पुस्तकावरून राजकीय वातारवरण तापल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी शरद पवारांचा भाजपला...

hyderabad director general of police: Hyderabad : नेत्यांच्या भडकाऊ भाषणांवर पोलिसांची नजर, कारवाईचा इशारा – hyderabad civic body election police chief warns against controversial...

हैदराबाद : हैदराबाद महानगर पालिका निवडणूक देशात चर्चेचा विषय ठरलीय. देशाचे गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी...

Recent Comments