Home देश Karnataka coronavirus: करोना संक्रमित ८ मृतदेह एकाच खड्ड्यात फेकले, मानवतेला धक्का -...

Karnataka coronavirus: करोना संक्रमित ८ मृतदेह एकाच खड्ड्यात फेकले, मानवतेला धक्का – Corona Virus : Bodies Of Covid 19 Victims Dumped In Pit, Karnataka


बंगळुरू : कर्नाटकच्या बेल्लारीमधून धक्कादायक आणि तितकीच दु:खद घटना समोर येतेय. करोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या मृत्यूनंतर प्लास्टिकमध्ये लपेटलेले मृतदेह खड्ड्यात फेकले गेल्याचं समोर आल्यानं अनेकांना धक्का बसलाय. जवळपास आठ मृतदेह एकाच खड्ड्यात टाकून विल्हेवाट लावण्यात आल्याचंही समोर येतंय. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला.

मानवी संवेदनांना धक्का

दरम्यान, बेल्लारीचे उपायुक्त एस एस नकुल यांनी या घटनेला दुजोरा दिलाय. या प्रकरणात मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी करोना प्रोटोकॉल पाळण्यात आले आहेत. आम्ही या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहोत. तुम्ही हा व्हिडिओ नीट पाहिल तर लक्षात येईल की करोना प्रोटोकॉलनुसार, मृतदेहांना योग्य पद्धतीनं प्लास्टिकमध्ये बांधलं गेलंय, असं त्यांनी म्हटलंय.

सोबतच, या प्रकरणात मानवी संवेदनांना मात्र धक्का लागल्याचं दिसून येतंय. मृतदेहांची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावण्यासाठी आपल्याला लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. मानवी संवेदना लक्षात घेतल्या तर या सर्व लोकांचा अंत्यविधी वेगवेगळा करण्यात यायला हवा होता, असंही त्यांनी नमूद केलंय.

वाचा :पाठदुखी, अतिसार आणि उलट्याही, करोनाची नवीन लक्षणं
वाचा :करोनावर लस कधी तयार होणार? PM मोदींनी घेतली महत्वाची बैठक
वाचा :कोरोनिलवर पतंजलीचा यू-टर्न; नोटिशीला दिले ‘हे’ उत्तर
वाचा :विशेष ट्रेनसाठी आता तत्काळ तिकीटाचीही सुविधा, रेल्वेची माहिती

दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश बेल्लारी प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. वृत्तसंस्था एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहांच्या विल्हेवाटसाठी सहभागी करण्यात आलेल्या फिल्ड टीमला सध्या हटवण्यात आलंय. त्यांच्याऐवजी विशेष प्रशिक्षण देण्यात आलेल्या एका टीमकडे आता ही जबाबदारी सोपवण्यात आलीय.

दरम्यान, जिल्हा प्रशासनानंही मृतांच्या कुटुंबीयांना तसेच ज्या लोकांना या प्रकरणामुळे दु:ख झालं त्यांना माफी मागितली आहे. राज्याचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनीही कर्मचाऱ्यांचा हे कृत्य ‘अमानवीय आणि दु:खदायी’ असल्याचं म्हटलंय. करोना संक्रमणामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या अंत्यसंस्कारादरम्यान अधिक काळजी घेण्याचं तसंच मानवी संवेदना लक्षात घेण्याचा आग्रह त्यांनी कर्मचाऱ्यांना केलाय.

वाचा :पिता-पुत्राच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास CID कडे
वाचा :नो किस! देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठी आता नवे नियम
वाचा :आरोग्य सेतू अॅपमध्ये तांत्रिक समस्या, युजर्सना लॉग इन करण्यात अडचणीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

ncb arrest two drug peddler: NCB च्या जाळ्यात ‘हाय प्रोफाईल’ दलाल, सलग तिसऱ्या दिवशी कारवाई – ncb arrest two drug peddler in south mumbai

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: नारकॉटिक्स कन्ट्रोल ब्युरोने (एनसीबी) अमली पदार्थविरोधी मोहिमेचा धडाका कायम ठेवला आहे. सलग तिसऱ्या दिवशी दोन दलालांना जेजे इस्पितळ परिसरातून...

Shahrukh Khan And Other Bollywood Celebrities Reaction On Indian Team Win Against Australia – शाहरुख खानने पहाटे उठून पाहिला पाचव्या दिवसाचा सामना, म्हणाला ‘आता...

मुंबई- भारतीय संघाने मंगळवारी ब्रिस्बेनच्या गाबा येथे चौथा कसोटी सामना ३ गडी राखून जिंकत इतिहास रचला. यानंतर सोशल मीडियावर खेळाडूंवर अभिनंदनाचा पाऊस पडत...

Recent Comments