Home देश Karnataka coronavirus: मेंढपाळाला करोनाची लागण; ४७ हून अधिक बकऱ्या क्वारंटीन - Corona...

Karnataka coronavirus: मेंढपाळाला करोनाची लागण; ४७ हून अधिक बकऱ्या क्वारंटीन – Corona Virus More Than 47 Goats Quarantined In Karnataka After Goatherd Tested Coronavirus Positive


बेंगळुरू: कर्नाटकीतील एका मेंढपाळाला करोना विषाणूची लागण झाल्यानंतर त्याच्याकडील एकूण ४७ बकऱ्यांना क्वारंटीन करण्यात आले आहे. ही घटना बेंगळुरूपासून १२७ किमीच्या अंतरावर असलेल्या तुमकुरू जिल्ह्यातील गोडकेरे गावात घडली आहे.

तुमकुरू जिल्ह्याच्या पशुपालन विभागाच्या अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितले की, गौरलहट्टी तालुक्यात सुमारे ३०० घरे आहेत. या गावातील एकूण लोकसंख्या १००० एवढी आहे. या गावात मेंढपाळाव्यतिरिक्त आणखी एका व्यक्तीला करोना विषाणूची लागण झाली आहे. या बरोबरच येथे ४ बकऱ्यांताही संशयित मृत्यू झाला आहे. त्यानंतर गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. काही बकऱ्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहितीही काही गावकऱ्यांनी दिली आहे.

स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवले भोपाळला

मंगळवारी जिल्हा पशु विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गावाला भेट दिली. त्यांनी तेथे पोहोचल्यानंतर बकऱ्यांना गावाच्या बाहेर क्वारंटीन केले. तेथे बकऱ्यांच्या स्वॅबचे नमुने गोळा करण्यात आले. या बकऱ्यांचे गोळा केलेले नमुने तपासणीसाठी भोपाळमधील पशु आरोग्य आणि पशु चिकित्सा संस्थेकडे पाठवण्यात आले आहे, अशी माहिती या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

वाचा: देशात एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या पोहोचली ५,८५,४९३ वर

या प्रकरणावर आपले पू्र्ण लक्ष असल्याचे पशुपालन विभागाचे सचिव पी. मनीवन्नन यांनी माहिती देताना सांगितले. या बरोबरच मृत्यू पावलेल्या बकऱ्यांचे शवविच्छेदनही करण्यात आले आहे. या बकऱ्यांचे नमुने तपासणीसाठी बेंगळुरू येथील इन्स्टिट्यूट ऑफ अॅनिमल हेल्थ अॅण्ड वेटनरी बायलॉजिकल्स (IAHVB) या संस्थेत पाठवण्यात आले आहेत.

वाचा: करोना संक्रमित ८ मृतदेह एकाच खड्ड्यात फेकले, मानवतेला धक्का

‘मानवांकडून पशुंना होत नाही करोनाचा संसर्ग’

माणसामुळे एखाद्या प्राण्याला करोनाची लागण झाल्याचे एकही उदाहरण आतापर्यंत दिसलेले नसल्याचे IAHVB चे संचालक डॉ. एस. एम. बायरेगौडा यांनी स्पष्ट केले आहे. सध्या हे नमुने भापाळला पाठवण्यात आले असून आमच्या कडे चाचणीचे किट उपलब्ध नसल्याचे डॉ. बायरेगौडा यांनी सांगितले. UAS च्या GKVK मध्ये प्राध्यापक असलेले डॉ. बी. एल. चिदानंद यांनीही करोना विषाणूसारखे ज्यूनोटिक विषाणू सामान्यत: जनावरांकडून माणसांमध्ये पसरतात, मात्र ते माणसांकडून जनावरांमध्ये पसरत नाहीत, असे स्पष्ट केले आहे.

वाचा: आजपासून देशात अनलॉक २.० सुरू; पाहा, काय आहे नवी नियमावली?Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Kangana Ranaut: वाईटावर चांगल्याचा विजय; कंगनानं पुन्हा राऊतांना डिवचलं – kangana ranaut attacks on cm uddhav thackeray, sanjay raut

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच तिच्या बेधडक वक्तव्यांमुळं चर्चेत असते. मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या कंगानानं पुन्हा एकदा संजय...

Kalyan Kale: ‘देवगिरी’त बागडेंनी आडवे येऊ नये – former mla dr. kalyan kale warns to mla haribhau bagde over devgiri cooperative sugar factory

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री'देवगिरी कारखान्यावर प्रशासकीय मंडळ येणारच. कारखाना सुरू होणार यात शंका नाही. मात्र, या कामात आमदार हरिभाऊ बागडेंनी आडवे येऊ नये,'...

Recent Comments