Home महाराष्ट्र kartiki yatra 2020: कार्तिकी यात्रेला बंधने; वारकरी संप्रदायानं घेतला 'हा' मोठा निर्णय...

kartiki yatra 2020: कार्तिकी यात्रेला बंधने; वारकरी संप्रदायानं घेतला ‘हा’ मोठा निर्णय – govt decided to denied entry in pandharpu for warkaris on kartiki ekadash


पंढरपूर: सर्वच राजकीय पक्षांच्या भेटी घेऊन मर्यादित स्वरूपात कार्तिकी यात्रा करण्याच्या भूमिकेला कोणत्याही पक्षाने साथ न दिल्याने यापुढे येणाऱ्या सर्व निवडणूक प्रक्रियेवर वारकरी संप्रदाय बहिष्कार टाकेल, अशी घोषणा वारकरी समन्वय समितीच्या बैठकीत करण्यात आली.

‘प्रत्येक वेळेला शासनाला सहकार्य करूनही वारकरी संप्रदयावर कायम अन्याय होत असेल तर आता संप्रदाय शांत राहणार नाही, अशी भूमिका राणा महाराज वासकर यांनी सांगितले. या पुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत वारकरी संप्रदाय गावोगावी जाऊन विठ्ठल भक्तांना निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करेल,’ असेही वासकर यांनी सांगितले.

वाचा: पुण्यात खळबळ; मनसे नेत्या रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी

‘एका बाजूला पिढ्यानपिढ्या वारी करणाऱ्या वारकऱ्यांना कार्तिकीला येण्यापासून मज्जाव करताना प्रातिनिधिक वारीचा दाखला शासन देत असेल तर मग शासकीय महापूजाही प्रातिनिधिक स्वरूपात करायला उपमुख्यमंत्री कशाला असा सवालही या बैठकीत करण्यात आला. एवढेच नियम पाळायचे असतील तर मग स्थानिक प्रांताधिकार्याच्या हातून कार्तिकी एकादशीची पूजा करावी, असे आवाहनही करण्यात आले.

वाचा: सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा?; चंद्रकांत पाटील म्हणतात…

वाचा: बनावट डिझेल प्रकरणाचा सूत्रधार कोण?; ‘या’ मंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरणSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments