Home देश kejriwal supports cm thackeray: उद्धव ठाकरे यांना माझा फुल्ल सपोर्ट: अरविंद केजरीवाल...

kejriwal supports cm thackeray: उद्धव ठाकरे यांना माझा फुल्ल सपोर्ट: अरविंद केजरीवाल यांचे ट्विट – delhi cm arvind kejriwal extends full support and solidariry to cm uddhav thackeray and people of maharashtra in the wake of cyclone nisarg


दिल्ली: महाराष्ट्रात कोरोनाच्या संकटानंतर निसर्ग चक्रीवादळाच्या परिणाम दिसून येऊ लागला आहे. आज बुधवारी दुपारी निसर्गने अलिबाग, श्रीवर्धन परिसराला धडक दिली. याचबरोबर मुंबई,नवी मुंबई परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. हे संकट लक्षात घेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही मुंबईकरांसाठी प्रार्थना केली आणि उद्धव ठाकरे यांना आपण आपल्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या सोबत असल्याचे सांगणारे ट्वीट केले.

अरविंद केजरीवाल यांनी ट्वीटमध्ये म्हणाले, ‘ प्रिय उद्धव ठाकरेजी, दिल्लीच्या जनतेच्या वतीने मी निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता आपल्या आणि महाराष्ट्रातील जनतेसमवेत उभा आहे. आम्ही महाराष्ट्रातील जनतेसाठी प्रार्थना करीत आहोत.’

अरविंद केजरीवाल यांच्याबरोबरच क्रिकेटपटू सुरेश रैना यांनीही निसर्ग चक्रीवादळाविषयी ट्विट केले आहे. सर्वांनी आपापल्या घरातच राहावे आणि प्रशासनाने घेतलेल्या खबरदारीच्या उपायांचे आणि सूचनांचे पालन करावे, असे आवाहन रैनाने केले.
दुपारी एक वाजण्याच्या सुमारास निसर्ग चक्रीवादळाने मुंबईच्या किनारपट्टी भागात जोरदार धडक दिली. यावेळी मुंबईत जोरदार वारा, पाऊस सुरू झाला आहे. समुद्रात उंच लाटा वाढत आहेत. मुंबईच्या अनेक भागात झाडे कोसळली आहेत, त्यामुळे वीज गेली आहे. याशिवाय अनेक ठिकाणी घरांची छप्परे उडण्याच्याही घटना घडलेल्या आहेत.

या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-वरळी सी लिंक रोड बंद करण्यात आला आहे. लोकांना समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच जनतेने घरात राहावे, असाही सल्ला देण्यात आला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

nashik corona update: करोनावाढीचा धोका २६ जानेवारीपर्यंत अधिक – nashik corona update : corona cases will increase till 26 January

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकदिवाळीनंतर नाशिकमध्ये काही दिवसांपासून रुग्णवाढीचा चढता क्रम पाहायला मिळत आहे. एक डिसेंबर ते २६ जानेवारी या कालावधीत अधिक रुग्णवाढ...

43 chinese apps: भारताचा पुन्हा डिजिटल स्ट्राईक, स्नॅक व्हिडिओसह ४३ मोबाइल अॅप्सवर बंदी – india bans another 43 chinese apps know details

नवी दिल्लीः भारत सरकारने आज पुन्हा एकदा डिजिटल स्ट्राईक केला आहे. केंद्र सरकारने देशाची सुरक्षेला धोका निर्माण करू पाहणाऱ्या अशा ४३ मोबाइल अॅप्सवर...

Uddhav Thackeray: Prevent Political Agitation In The Crisis Of The Coronavirus Says Uddhav Thackeray – Uddhav Thackeray: करोना संकटात भाजपची आंदोलनं; CM ठाकरेंनी PM...

मुंबई: करोनाची लाट पुन्हा येत आहे, अशा परिस्थितीत केंद्राच्या सूचनेनुसार तसेच योग्य त्या सावधतेने आम्ही जनजीवन पूर्वपदावर आणत आहोत मात्र, काही राजकीय पक्ष...

Recent Comments