Home देश killing of pregnant elephant: गर्भवती हत्तीणीची हत्या: केरळचे मुख्यमंंत्री विजयन म्हणाले...! -...

killing of pregnant elephant: गर्भवती हत्तीणीची हत्या: केरळचे मुख्यमंंत्री विजयन म्हणाले…! – kerala cm p vijayan says that we are focusing on three suspects on killing of pregnant elephant


तिरुवनंतपुरम: केरळमधील पलक्कड येथे गर्भवती हत्तीणीच्या क्रूर हत्येप्रकरणी तपास सुरू असून या प्रकरणी तीन संशयितांवर पोलिसांचे लक्ष असून या प्रकरणी न्याय हा होणारच, लोकांच्या भावना व्यर्थ जाऊ देणार नाही, अशी भूमिका केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यानी जाहीर केली आहे.

केरळमधील पिलक्कड या जिल्ह्यात गर्भवती हत्तीणीला आपला जीव गमवावा लागला. याचा निषेध करत अनेककांनी आमच्यापर्यंत आपल्या भावना पोहोचवल्या आहेत. मी तुम्हाला शब्द देतो की, तुमची तळमळ, तुमचे प्रयत्न आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. न्याय हा मिळणारच, असा विश्वास मुख्यंत्री विजयन यांनी प्राणीप्रेमींना दिला आहे.

या प्रकपणाचा तपास सुरू करण्यात आला असून, आम्ही तीन संशयितांवर लक्ष केंद्रीत केले आहे. पोलिस आणि वन विभाग संयु्क्तपणे हा तपास करत आहेत, असे मुख्यमंत्री विजयन म्हणाले. आज जिल्हा पोलिस प्रमुख आणि जिल्हा वन अधिकारी यांनी घटनास्थळाला भेट दिली. दोषींना शोधून काढण्यासाठी आणि त्याना शिक्षा देण्याच्या दृष्टीने आम्ही शक्य ते सर्व करून असेही मुख्यमंत्री विजयन म्हणाले.

वन्य प्राण्यांवर माणसांकडून सतत अत्याचार होताना दिसत असून या मागची नेमकी कारणे काय आहेत याचाही आम्ही शोध घेत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हवामान बदलाचा परिणाम स्थानिक नागरिक आणि वन्य प्राण्यांवरही होत असावा असेही ते पुढे म्हणाले.

काहींनी या दुर्दैवी घटनेचा उपयोग द्वेषाचे अभियान चालवण्यासाठी केल्याचे आमच्या लक्षात आले असल्याचे मुख्यमंत्री विजयन एका ट्विटमध्ये म्हणाले. काही लोक खोट्या माहितीच्या आधारे चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

अन्यायाविरोधातील कोणत्याही अभियानाला केरळ हे नेहमीच पाठिंबा देत आले आहे. अशा प्रकारच्या अन्यायाविरोधातील कोणताही आवाज आता ऐकला जात आहे,असेही मुख्यमंत्री म्हणाले. आपण अन्यायाविरोधात लढा देणाऱ्या, आवाज उठवणाऱ्या लोकांमधील एक बनूया, असे आवाहनही त्यांनी केले.

संशयितांची चौकशी सुरू

गर्भवती हत्तीणीच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी तपास योग्य दिशेने जात असल्याचे केरळच्या वन विभागाचेही म्हणणे आहे. या प्रकरणी काही संशयितांची चौकशी सुरू असल्याचेही वन विभागाने म्हटले आहे. या तपासासाठी तयार करण्यात आलेली एसआयटीही योग्य दिशेने जात आहे. दोषींना कठोरातील कठोर शिक्षा मिळावी यासाठी वन विभाग सर्व प्रयत्न करेल, असे वन विभागाने म्हटले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Kangana Ranaut: वाईटावर चांगल्याचा विजय; कंगनानं पुन्हा राऊतांना डिवचलं – kangana ranaut attacks on cm uddhav thackeray, sanjay raut

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच तिच्या बेधडक वक्तव्यांमुळं चर्चेत असते. मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या कंगानानं पुन्हा एकदा संजय...

Kalyan Kale: ‘देवगिरी’त बागडेंनी आडवे येऊ नये – former mla dr. kalyan kale warns to mla haribhau bagde over devgiri cooperative sugar factory

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री'देवगिरी कारखान्यावर प्रशासकीय मंडळ येणारच. कारखाना सुरू होणार यात शंका नाही. मात्र, या कामात आमदार हरिभाऊ बागडेंनी आडवे येऊ नये,'...

RCB vs CSK: RCB vs CSK IPL 2020: बेंगळुरू विरुद्ध चेन्नई प्रतिष्ठ वाचवण्यासाठी खेळणार – rcb vs csk ipl 2020 match preview update and...

दुबई: IPL 2020आयपीएलच्या १३व्या हंगामात आज रविवारी डबल हेडरमधील पहिली लढत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (Royal Challengers Bangalore vs Chennai...

Recent Comments