Home विदेश Kim Jong Un: किम जोंग यांच्यावर शस्त्रक्रिया झालीच नाही! - kim jong...

Kim Jong Un: किम जोंग यांच्यावर शस्त्रक्रिया झालीच नाही! – kim jong un did not have surgery said south korea


सेउल: उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया करण्यात आलेली नाही; तसेच त्यांच्यावर कोणतीही वैद्यकीय उपचार पद्धती सुरू नाही, अशी माहिती कोरियाच्या प्रशासनाने दिली आहे. किम जोंग यांच्या प्रकृतीविषयी सुरू असलेल्या विविध अफवांच्या पार्श्वभूमीवर ही माहिती देण्यात आली आहे.

किम यांनी शनिवारी एका जाहीर कार्यक्रमात हजेरी लावली होती. किम यांच्याबाबत प्रसिद्ध झालेल्या अफवांनंतर २० दिवसांच्या फरकाने त्यांचे सार्वजनिक जीवनात दर्शन झाले होते. किम यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, किम यांचे निधन झाले आहे, अशा विविध स्वरूपाच्या बातम्या आंतरराष्ट्रीय माध्यमातून येत होत्या. त्यानंतर रविवारी दक्षिण कोरियाच्या अध्यक्षीय कार्यालयाच्या सूत्रांनी माहिती जाहीर केली आहे. सार्वजनिक जीवनातून काही काळासाठी ‘एक्झिट’ घेण्याचा प्रकार किम जोंग उन यांनी २०१४ मध्येही एकदा केला होता. त्या वेळी ते सहा आठवडे सार्वजनिक जीवनापासून दूर होते.

वाचा: किम यांनी उद्घाटन केलेल्या कारखान्यापासून जगाला धोका!
वाचा: उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया सीमेवर गोळीबार

दरम्यान, किंम जोंग उन यांनी सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. किम जोंग उन यांची प्रकृती उत्तम असल्याचे वृत्त वाचून आनंद झाला. त्यांची प्रकृती उत्तम राहो, हीच सदिच्छा असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवर म्हटले. किम जोंग यांनी एक मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी एका खत कारखान्याचेही उद्घाटन केले.

आणखी वाचा:
किम जोंग जिवंत! खत कारखान्याचे केले उद्घाटन
‘ड’ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे करोनाचा धोका!
युरोपमध्ये करोनाचा कहर; तीनपैकी एका रुग्णाचा मृत्यूSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

offsite atms: पुण्यात यापुढं फक्त बँकेच्या शाखेजवळच ATM सुविधा? – most of banks have decided to close offsite atm centres in pune

पुणे: बँकांच्या शाखांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी असणारी 'एटीएम' केंद्रे (ऑफसाइट एटीएम) बंद करण्याचा निर्णय बहुतांश बँकांनी घेतला आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. शॉपिंग...

Narendra Modi Took His First Dose Of Covid 19 Vaccine At Aiims Delhi – लसीकरणाचा दुसरा टप्पा : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली करोना लस...

हायलाइट्स:देशभरात करोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवातपंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली लस६० वर्षांहून अधिक वयाच्या किंवा गंभीर आजारांशी झुंज देत असणाऱ्या ४५ वर्षांहून अधिक वयाच्या...

maharashtra budget session live updates: Maha Vikas Aghadi Government Prepared To Handle Opposition – Maharashtra Budget Session Live Updates: राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून...

हायलाइट्स:राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासूनकरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून महत्त्वाच्या घोषणांची शक्यतामराठा आरक्षण, करोनाचा वाढता प्रादुर्भाव आदी मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरणारराज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून...

Recent Comments