Home विदेश Kim Jong-un and Donald Trump 2-Year Anniversary - अमेरिकेविरोधात उत्तर कोरियाची मोर्चेबांधणी;...

Kim Jong-un and Donald Trump 2-Year Anniversary – अमेरिकेविरोधात उत्तर कोरियाची मोर्चेबांधणी; किम वाढवणार सैन्याची ताकद


सेउल: उत्तर कोरिया आणि अमेरिकेतील संबंध पुन्हा एकदा तणावाची होणार असल्याची चिन्हं आहेत. अमेरिकेविरोधात उत्तर कोरियाने मोर्चेबांधणी सुरू केली असून सैन्याची ताकद वाढवण्यात येणार आहे. त्याबाबत उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांनी आदेश दिले आहेत.

अमेरिकेकडून निर्बंध लादण्यात येणार असून आणखी दबाब वाढवण्यात येणार असल्याची शंका उत्तर कोरियाला आहे. अमेरिकेकडून तसे प्रयत्न झाल्यास किम जोंग आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील वैयक्तिक पातळीवरील संबंधांना काहीच अर्थ उरत नसल्याचेही उत्तर कोरियाने स्पष्ट केले आहे. किम जोंग आणि ट्रम्प यांच्यातील शिखर परिषद चर्चेला दोन वर्ष पूर्ण झालीत. त्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री री सोन ग्वोन यांनी सांगितले की, दोन्ही देशातील सर्वोच्च नेत्यांमधील खासगी संबंध चांगले असून उपयोग नाही. दोन्ही देशांना त्याचा फायदा झाला पाहिजे. अमेरिकेकडून उत्तर कोरियाला मदत, सहकार्य मिळत नसेल तर फक्त हवेतल्या गप्पांमध्ये उत्तर कोरियाला काहीच रस नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

वाचा: किम जोंगला ‘याची’ भीती; पक्ष नेत्यांपासून सुरक्षित अंतर!

किम आणि ट्रम्प यांच्यामध्ये २०१८ मध्ये सिंगापूर येथे झालेल्या शिखर बैठक चर्चेत दोन्ही देशांतील संबंध मजबूत करण्यावर भर देण्यात आला होता. त्यानंतर फेब्रुवारी २०१९ मध्ये व्हिएतनाममध्ये दोन्ही देशांच्या या नेत्यांमध्ये दुसरी शिखर बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत उत्तर कोरियाने अणवस्त्र कार्यक्रमात काही अंशी थांबवण्याच्या बदल्यात अमेरिकेने काही निर्बंध शिथिल करावेत अशी मागणी कोरियाने केली होती. मात्र, अमेरिकेने ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर अमेरिका आणि उत्तर कोरियातील संबंधांमध्ये फारशी सुधारणा झाली नाही.

आणखी वाचा:
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘या’ ट्विटने चीनचा तिळपापड!
अमेरिका, रशियापेक्षा भारतीय जवान ‘लय भारी’!; चिनी तज्ञाकडून कौतुकSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

e vehicle may be delay due to corona: करोनाचे संकट; ई-वाहनांना लागणार ब्रेक – e-vehicles will be delayed

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : सन २०३० पर्यंत संपूर्ण देशात ई-वाहने रस्त्यांवर चालवली जातील, हा केंद्र सरकारचा संकल्प अयशस्वी ठरण्याची शक्यता आहे. करोनाचे संकट...

Marathwada : २४ तासांत आढळले ५८५ नवे करोनाग्रस्त

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद मराठवाड्यात एका दिवसात आढळणाऱ्या बाधितांच्या संख्या कमी होत असून, गुरुवारी (२३ ऑक्टोबर) विभागाातील आठही जिल्ह्यांत ५८६ नवीन बाधित आढळले...

Recent Comments