Home विदेश Kim Jong Un: Kim Jong Un पत्नीच्या अपमानाचा सूड; किम जोंग यांनी...

Kim Jong Un: Kim Jong Un पत्नीच्या अपमानाचा सूड; किम जोंग यांनी बॉम्बने उडवले ऑफिस – kim jong un was infuriated by dirty depiction of his wife in south korean propaganda


सोल: काही दिवसांपूर्वी दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियामध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडले जाईल अशी भीती व्यक्त केली जात होती. उत्तर कोरियाने सीमेवरील दक्षिण कोरियाच्या संपर्क कार्यालयावर बॉम्ब टाकून ते उडवून दिले. उत्तर कोरियाने केलेल्या या कारवाईचे कारण समोर आलें असून किम यांच्या पत्नीचे आक्षेपार्ह फोटो प्रसारीत केल्यामुळे या दोन देशांमध्ये तणाव निर्माण झाला असल्याची चर्चा आहे.

मागील काही महिन्यांपासून दक्षिण कोरियाच्या हद्दीतून उत्तर कोरियाविरोधात संदेश देणारे फुगे व पत्रके सोडण्यात येत होती. उत्तर कोरियातून पळून आलेल्या नागरिकांकडून हे कृत्य केले जात असल्याचे म्हटले जाते. फुगे सोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी किम जोंग यांची बहीण किम यो जोंगने दक्षिण कोरियाकडे केली होती. मात्र, दक्षिण कोरियाने याकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतर किम यो यांनी दक्षिण कोरियाविरोधात लष्करी कारवाई करण्याची धमकी दिली होती. काही विरोधकांच्या फुगे व पत्रक सोडण्यावरून नव्हे तर त्यातील मजकूर आणि छायाचित्रावरून उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा आणि राष्ट्राध्यक्ष किम जोंग आणि त्यांची बहीण किम यो यांनी संताप व्यक्त केला होता.

वाचा:उत्तर कोरियाने संपर्क कार्यालय उडवले; उत्तर व दक्षिण कोरियामध्ये तणाव

वाचा: आता लष्करच कारवाई करणार; उत्तर कोरियाची दक्षिण कोरियाला धमकी

दक्षिण कोरियातून येणाऱ्या किमविरोधी पत्रकात किम यांच्या पत्नीवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्याशिवाय त्यांचे आक्षेापार्ह छायाचित्रही प्रसारीत करण्यात आले होते. त्यामुळे किम यो यांनी दक्षिण कोरियाकडे या बंडखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. किम यांच्या पत्नीबद्दल खालच्या पातळीवर टीका करण्यात येत असल्याच्या वृत्ताला उत्तर कोरियातील रशियन दूतावासाने दुजोरा दिला असल्याचे ‘डेली मेल’ने म्हटले आहे. उत्तर कोरियात सोडण्यात येणाऱ्या फुग्यांवर, पत्रकांमध्ये किम यांची पत्नी री सोल जू यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा आणि छायाचित्राचा वापर केला असल्याचे त्यांनी सांगितले.

वाचा: किम जोंगच्या आहारात ‘हे’ खास सूप आणि महागडी वाईन!

दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाविरोधात जाणिवपूर्वक अशी मोहीम सुरू केली असल्याचा आरोप उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. किम यांच्याविरोधात वातावरण तयार करणे आणि लोकांमध्ये असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. दक्षिण कोरियाच्या बाजूने लाऊडस्पीकर लावण्यात येत असल्याचे रशियन राजदूत अलेक्झांडर मात्सगोरा यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले.

वाचा: किम जोंगला ‘याची’ भीती; पक्ष नेत्यांपासून सुरक्षित अंतर!

दरम्यान, किम यांच्या सत्तेला कंटाळलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी उत्तर कोरियातून दक्षिण कोरियात आश्रय घेतला आहे. हे कार्यकर्ते म्हणजे शत्रूंच्या भूमीवरील किडे असून त्यांनी मायदेशासोबत गद्दारी केली असून त्यांचे मालक असलेल्या दक्षिण कोरियाला धडा शिकवण्याची वेळ आली असल्याचेही याआधी किम यो यांनी म्हटले होेते. किम जोंग उननंतर उत्तर कोरियाच्या राजकारणावर किम यो जोंग यांचीच पकड असल्याचे म्हटले जाते. किम यांच्या अनेक निर्णयामागे किम यो यांची भूमिका असते.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

leopard couple died in nashik: बिबट्याच्या जोडीचा गोदापात्रात बुडून अंत – leopard couple died due drowning in godavari river

म. टा. वृत्तसेवा, निफाडभक्ष्याच्या शोधात रात्रीची भटकंती करताना गोदावरी नदीपात्रातील गाळामध्ये अडकून पडले त्यातच नाकातोंडात पाणी गेल्याने बिबट्या व व त्याची मादी या...

Ajinkya Rahane: IND vs AUS : भारताच्या विजयानंतर अजिंक्य रहाणे नेमकं काय म्हणाला, पाहा… – ind vs aus : indian captain ajinkya rahane what...

ब्रिस्बेन, IND vs AUS : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजयाची नोंद केली. या विजयानंतर अजिंक्यवर जोरदार कौतुक होत आहे. पण...

Recent Comments