Home शहरं मुंबई Kishori Pednekar : मुंबईच्या महापौर होम क्वॉरंटाइन; आपत्कालिन विभागातील दोघे बाधित -...

Kishori Pednekar : मुंबईच्या महापौर होम क्वॉरंटाइन; आपत्कालिन विभागातील दोघे बाधित – mumbai mayor kishori pednekar decide to home quarantine


मुंबई: मुंबईत करोनाचा मोठा प्रादुर्भाव वाढला आहे. या काळात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या पालिकेच्या सर्व रुग्णालयांना भेट देऊन करोना रुग्णांसाठीच्या व्यवस्थेची पाहणी करत होत्या. या दरम्यान अनेकांच्या संपर्कात यावं लागल्याने महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वत:ला होम क्वॉरंटाइन केलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून स्वत:हून क्वॉरंटाइन करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षात दोघांना करोनाची बाधा झाल्याचं आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मुंबईतील रुग्णालये सज्ज राहावी म्हणून महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील पालिकेच्या सर्व प्रमुख आणि इतर रुग्णालयातही जाऊन पाहणी केली होती. क्वॉरंटाइन सेंटरचीही त्यांनी पाहणी केली होती. तसेच डॉक्टरांशी चर्चा करून त्यांचीही आस्थेवाईकपणे चौकशी केली होती. त्यानंतर त्यांनी पालिकेच्या विविध अधिकाऱ्यांशी अनेक बैठका घेऊन चर्चाही केल्या होत्या. समिती अध्यक्ष, नगरसेवक आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशीही त्या संपर्कात होत्या. मुंबईतील ५३ पत्रकारांना करोनाची लागण झाल्याचे उघड झाल्याने पेडणेकर यांनी खबरदारीचा उपाय म्हणून होम क्वॉरंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या स्टाफलाही क्वॉरंटाइन करण्यात येत आहे. सामान्य लोक क्वॉरंटाइन झालेले आहेत. त्यामुळे आपणही क्वॉरंटाइन झालं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे त्यांना १४ दिवस घरात थांबावं लागणार आहे. त्यांनी त्यांची करोना टेस्टही केली असून महापौर बंगला सॅनिटाइझ केला आहे.

मुंबईतील ५३ पत्रकारांना करोनाची लागण

दरम्यान, महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षात करोनाचे दोन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. मात्र आपत्कालीन विभाग हा अत्यावश्यक सेवा असल्याने हा विभाग बंद करणं शक्य नाही. या विभागाचं काम सुरूच राहील, असं पालिकेने स्पष्ट केलं आहे. तसेच आपत्कालिन विभागाचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं आहे.

नागपुरात करोनाच्या रुग्णांची संख्या ८० वर

औरंगाबादः ३१ करोना रुग्णांपैकी १४ ठणठणीत

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

nitish kumar cabinet expansion likely soon: बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग, कुणाची लागणार वर्णी? – bihar cm nitish kumar cabinet expansion likely soon

पाटणाः बिहारमधील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावर राजकारण तापलं असताना नितीशकुमार सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग ( nitish kumar cabinet expansion likely soon ) आला...

US Inauguration Day 2021 Live Update: Joe Biden and Harris Inauguration Day Live बायडन होणार अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष – US Presidential Elections Joe...

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या इतिहासातील एका नव्या पर्वाला सुरुवात होत असून आज, बुधवारी अमेरिकेचे ४६वे अध्यक्ष म्हणून जो बायडेन, तर उपाध्यक्षपदासाठी कमला हॅरिस पद आणि...

Mumbai Indians: IPL 2021: मुंबई इंडियन्सने या अनुभवी खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता; जाणून घ्या संपूर्ण यादी – ipl 2021 mumbai indians released lasith malinga...

नवी दिल्ली: IPL 2021 आयपीएलचे सर्वाधिक विजेतेपद मिळवणारे तसेच विद्यमान विजेते मुंबई इंडियन्स (mumbai indians) संघाने या वर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी रिटेन आणि रिलीझ...

Recent Comments