Home शहरं कोल्हापूर kolhapur adkur scam: 'सेवा' संस्थेत खाल्ला दीड कोटींचा 'मेवा'; १६ जणांवर गुन्हा...

kolhapur adkur scam: ‘सेवा’ संस्थेत खाल्ला दीड कोटींचा ‘मेवा’; १६ जणांवर गुन्हा दाखल – rs 1.5 crore scam in vikas seva sanstha case filed against 16 persons


कोल्हापूर:कोल्हापूर जिल्ह्यातील अडकूर (ता. चंदगड) येथील अडकूर विकास सेवा संस्थेत सभासदांच्या खोट्या सह्या आणि नोंदी घेऊन दीड कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार लेखा परीक्षणात समोर आला आहे. याबाबत लेखा परीक्षक नामदेव जोतिबा सरनोबत (रा. शिक्षक कॉलनी, चंदगड) यांनी चंदगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी १६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

वाचा: लाचखोर तलाठ्यासह दोघे ‘असे’ सापडले एसीबीच्या जाळ्यात

अशोक पांडुरंग जाधव (रा. मलगेवाडी), दत्तात्रय धोंडिबा देसाई, जगन्नाथ गोपाळ इंगवले, संतू रवळू गुरव, नारायण लक्ष्मण इंगवले, सिद्धोजी शामराव देसाई, राजाराम नारायण घोरपडे, प्रकाश तुकाराम इंगवले, मीना वैजू शिंदे, कादर आदम कोवाडकर (सर्व रा. अडकूर, ता. चंदगड) उत्तम संतुराम चिलगोंडे, महादेव धोंडिबा नाईक, रंजना सुरेश कबाडे (सर्व रा. मलगेवाडी), पुंडलिक बाबू घोळसे (रा. अलबादेवी), डी. एच. मुल्ला (रा. कोवाड) आणि आनंदा कोंडिबा कांबळे (रा. हाळोली, ता. आजरा) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

वाचा: एटीएम सेंटरमध्ये त्याला मिळाले २० हजार रुपये अन्…

चंदगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी संगनमताने सेवा संस्थेच्या कागदपत्रांत फेरफार केला. सभासदांच्या खोट्या सह्या केल्या. संस्थेतील शिल्लक रक्कम कमी दाखवून सभासदांचा विश्वासघात केला. लेखा परीक्षणात अपहाराचा प्रकार उघडकीस आला. एप्रिल २०१७ ते जून २०२० या काळात संशयितांनी दीड कोटी रुपयांचा अपहार केल्याचा उल्लेख फिर्यादीत केला आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती चंदगड पोलिसांनी दिली.

दरम्यान, अडकूर विकास सेवा संस्था ही या भागातील एक प्रमुख सेवा संस्था आहे. या संस्थेशी हजारो सभासद जोडले गेलेले आहे. या संस्थेतील अपहार चव्हाट्यावर आल्याने सारेच हादरले आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments