Home शहरं कोल्हापूर kolhapur brother murder: सख्ख्या भावाचा खून केला होता; कोर्टाच्या निकालाने घडली जन्माची...

kolhapur brother murder: सख्ख्या भावाचा खून केला होता; कोर्टाच्या निकालाने घडली जन्माची अद्दल – life imprisonment for murder of brother


कोल्हापूर: गावात झालेल्या भांडणात सख्ख्या भावाने गावकऱ्यांच्या बाजूने सहभाग घेतला. याचा राग मनात धरून बळवंत ऊर्फ बाळू ज्ञानू घाग (रा. पनोरे, ता. पन्हाळा) याने गोळी झाडून भाऊ पांडुरंग ज्ञानू घाग (५५) याचा खून केला होता. याप्रकरणी कोल्हापूर तदर्थ जिल्हा न्यायाधीश डी. के. गुडधे यांनी आरोपी बळवंत उर्फ बाळू घाग यास गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी वकील सुजाता इंगळे यांनी युक्तिवाद केला. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली.

सरकारी वकील इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पन्हाळा तालुक्यातील पनोरे गावात राहणारा आरोपी बळवंत ऊर्फ बाळू घाग याने शरद चौगुले यांच्या बहिणीस दगड मारून जखमी केले होते. यामुळे गावात भांडण झालं. याबाबत गावातील प्रमुख मंडळींनी बैठक बोलावली होती. या बैठकीत पांडुरंग ज्ञानू घाग व त्यांचा भाऊ संभाजी ज्ञानू घाग या दोघांनी आरोपी व सख्खा भाऊ बळवंत घाग याची बाजू न घेता गावकऱ्यांच्या बाजूने सहभाग नोंदवला. याचा राग बळवंत याला आला होता. त्यातून त्याने भयंकर कृत्य केले.

‘तो’ पंतप्रधान कार्यालयातील विशेष अधिकारी म्हणून वावरत होता!

२९ मे २०१६ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास बळवंत ऊर्फ बाळू घाग, त्यांचा मित्र गुंडू सखाराम पाटील (रा. खेरवडे, ता. गगनबावडा) आणि १२ बोअरची बंदूक नावावर असणारा भगवान देवबा शेलार (रा. जरगी, ता. गगनबावडा) असे तिघेजण पांडुरंग घाग यांच्या घराजवळ गेले. घराच्या पाठीमागील बाजूस परड्यातून येऊन त्यांनी दारावर लाथा मारल्या. यावेळी पांडुरंग यांची मुलगी अनिता घागने दरवाजा उघडला. तेव्हा बळवंत घागने भगवान शेलार यांची बंदूक घेऊन सख्खा भाऊ पांडुरंग याच्यावर गोळी झाडली. मुलीने आरडाओरडा केल्यानंतर संभाजी घाग धावत गेले. बळवंत घागने संभाजी यांच्यावरही गोळीबार केल्याने ते गंभीर जखमी झाले होते. बळवंत यांच्या सोबत आलेले गुंडू पाटील आणि भगवान शेलार तेथून पळून गेले. जखमी पांडुरंग घाग यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर संभाजी घाग हे उपचारानंतर बरे झाले.

याबाबत कळे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता. सरकारी वकील सुजाता इंगळे यांनी या खटल्यात २२ साक्षीदार तपासले. उपलब्ध पुरावे आणि सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून तदर्थ जिल्हा न्यायाधीश डी. के. गुडधे यांनी प्रमुख मुख्य आरोपी बळवंत ऊर्फ ज्ञानू घाग यास कलम ३०२ नुसार जन्मठेप, ३०७ नुसार दहा वर्षे सक्तमजुरी व आर्म अॅक्टनुसार दोन वर्षे सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली. यातील सहआरोपी गुंडू पाटील यांचा मृत्यू झाला आहे तर भगवान शेलार याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

कोल्हापूर: ‘या’ संस्थेत लाखोंचा घोटाळा; माजी उपमहापौरांवर गुन्हाSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

punjab government: पंजाबचे बंड – punjab state government challenge central government over farm laws

केंद्र सरकारच्या शेतीविषयक तीन नव्या कायद्यांना रस्त्यावर होत असलेला विरोध आता विधिमंडळापर्यंत पोहोचला असून, पंजाबमधूनच त्याची सुरुवात झाली आहे. पंजाब विधानसभेने केंद्राच्या तिन्ही...

Eknath Khadse: खडसेंसाठी राष्ट्रवादीच्या एकाचे मंत्रिपद जाणार – one ncp minister will has resign from his post for eknath khadse

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शुक्रवारी प्रवेश करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यायला लावला जाणार असल्याच्या बातम्याही चर्चिल्या...

BSNL festive offer: BSNL युजर्ससाठी फेस्टिव सीजनमध्ये ऑफर्स, या रिचार्जवर बंपर फायदे – festive offer: bsnl extends validity of rs 1999, rs 699, rs...

नवी दिल्लीः बीएसएनएल कंपनीने फेस्टिवल सीजनमध्ये आपल्या ग्राहकांना बंपर ऑफर देत आहे. बीएसएनएल मध्ये अनेक प्रिपेड व्हाऊचर्स (PVs) आणि स्पेशल टॅरिफ व्हाउचर्स (STVs)...

Recent Comments