Home शहरं कोल्हापूर Kolhapur Covid Deaths: Kolhapur Covid Death: रिक्षा करून रुग्णालयातून पळालेल्या करोना रुग्णाचा...

Kolhapur Covid Deaths: Kolhapur Covid Death: रिक्षा करून रुग्णालयातून पळालेल्या करोना रुग्णाचा मृत्यू – coronavirus: kolhapur reports one more covid death, total toll in district goes up to 12


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापुरील सीपीआर रुग्णालयातून इचलकरंजीला पळालेल्या ५५ वर्षीय करोनाबाधित रुग्णाचा बुधवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. यंत्रमाग कामगार असलेल्या या व्यक्तीच्या मृत्यूने कोल्हापुरातील करोना बळींची संख्या १२ झाली आहे. हा रुग्ण २४ जूनला सीपीआरमधून पळाला होता. आरोग्य यंत्रणांनी त्याला ताब्यात घेऊन पुन्हा उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले होते. (Corona Death cases in Kolhapur)

वाचा: ‘देवळं बंद असताना तुमच्या रूपानं देव सगळ्यांना दिसतोय’

इचलकरंजीतील ५५ वर्षीय यंत्रमाग कामगाराला २२ जूनला सीपीआरमध्ये दाखल केले होते. २३ जूनला त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर २४ जूनला सकाळी त्याने सीपीआरमधील डॉक्टर आणि सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून पळ काढला होता. महाराणा प्रताप चौकातून एका रिक्षाने तो थेट इचलकरंजी येथील कुडचे मळ्यातील घरात पोहचला होता. पॉझिटिव्ह रुग्ण सीपीआरमधून पळाल्याचे लक्षात येताच आरोग्य यंत्रणांनी पोलिसांच्या मदतीने त्याला पकडून पुन्हा उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान प्रकृती अधिकच बिघडल्याने बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. इचलकरंजीतील हा करोनाचा तिसरा बळी आहे, तर जिल्ह्यात बाराव्या करोना बळीची नोंद झाली.

वाचा: ‘लालबागचा राजा’चा गणेशोत्सव रद्द; यंदा फक्त आरोग्यउत्सव

दरम्यान, जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ८४१ एवढी असून, यातील ७२० रुग्ण पूर्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या ११० रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी दिली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments