Home शहरं कोल्हापूर Kolhapur Crime: फ्लॅटचा मालक असल्याची बतावणी; २२ लाखांना घातला गंडा - man...

Kolhapur Crime: फ्लॅटचा मालक असल्याची बतावणी; २२ लाखांना घातला गंडा – man cheated rs 22 lakh to pretext of selling flat in kolhapur


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : रमणमळा परिसरातील गजानन महाराज रेसिडेन्सी रिजन येथील फ्लॅट विकत देतो अशी बतावणी करून विजय तानाजी जरग (रा. मुक्त सैनिक वसाहत, कोल्हापूर) याने २२ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे. विजय प्रकाश पाटील (रा. खर्डेकर गार्डन, ताराबाई पार्क) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी विजय तानाजी जरग (रा. मुक्त सैनिक वसाहत) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

रमणमळा परिसरातील पोलो ग्राऊंडजवळ असलेला फ्लॅट मूळ मालक राजेंद्र बागल यांच्या नावावर आहे. मात्र, या फ्लॅटचे आपणच मालक असल्याचे सांगून विजय जरग याने विजय पाटील यांच्यासोबत ७२ लाख रुपयांना फ्लॅट विक्रीचा व्यवहार निश्चित केला होता. २०११ ते २६ जानेवारी २०२० या कालावधीत जरग याने फिर्यादींकडून २२ लाख रुपये घेतले. नऊ वर्षे उलटूनही फ्लॅटचा ताबा मिळत नसल्याने फिर्यादी पाटील यांनी जरग याच्याकडे पैसे परत मागितले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी रविवारी (ता. २७) रात्री शाहूपुरी पोलिसांत तक्रार दिली.

बेरोजगार पतीसोबत कडाक्याचं भांडण; महिलेनं वाहत्या नदीत मारली उडी

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ‘तो’ रात्रीच्या अंधारात मंदिरांमध्ये जायचा…

वर्धा हादरले! १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कारSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Aditya Roy Kapur: एका कॉलवर आदित्य रॉय कपूरच्या मदतीला धावून आले रामदास आणि सत्यजित पाध्ये – Aditya Roy Kapur Becomes Bollywoods First Actor Get...

मुंबई- अनुराग बसू यांनी दिग्दर्शित केलेला 'लुडो' हा चित्रपट एका ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता आदित्य रॉय-कपूरनं या चित्रपटात एका शब्दभ्रमकाराची भूमिका...

सटाण्यातील व्यावसायिक माखिजा यांची आत्महत्या

म. टा. वृत्तसेवा, सटाणा सटाणा शहरातील बागलाण ब्रॅण्डी हाऊसचे संचालक (वय ६२) यांनी रविवारी सायंकाळी लोहणेर येथील पुलावरून गिरणा नदीपात्रात उडी मारून ...

व्यापारी सासूरवाडीला गेला होता, फ्लॅटवर परतल्यानंतर दृश्य बघून हादरलाच

म. टा. प्रतिनिधी, : सासूरवाडीला गेलेल्या कापड व्यवसायिकाचे घर फोडून चोराने दोन लाखांची रोकड आणि दोन तोळ्याचे दागिने लांबविल्याची घटना सोमवारी (२३ नोव्हेंबर)...

Recent Comments