Home शहरं कोल्हापूर kolhapur mahapalika election 2020: मतदार यादीचे काम सुरू; महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजण्याची...

kolhapur mahapalika election 2020: मतदार यादीचे काम सुरू; महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजण्याची चिन्हे – kolhapur mahapalika election 2020 update voter list order maharashtra election commission


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः कोल्हापूर महागनगरपालिकेच्या विद्यमान सभागृहाची मुदत नोव्हेंबरमध्ये संपणार आहे, यामुळे नव्या सदस्यांच्या निवडीसाठी प्रभाग रचना व मतदार यादीचे काम सुरू करा असा आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिला आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रखडलेले काम आता सुरू होणार असल्याने निवडणुकीचा बिगुल वाजण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.

कोल्हापूर महापालिकेच्या सध्याच्या नगरसेवकांची मुदत १५ नोव्हेंबर पर्यंत आहे. यामुळे ऑक्टोबर महिन्यात नव्या सदस्य निवडीसाठी मतदान होणे आवश्यक आहे. त्यासाठी मतदार यादी व प्रभाग रचनेला कामाला मार्च अथवा एप्रिल महिन्यात सुरू होणे आवश्यक होते. मात्र करोना संसर्गामुळे हे काम सुरू करण्यात आले नाही. या कामाला किमान सहा ते सात महिन्याचा कालावधी लागतो. यामुळे निवडणूका वेळेत होणे अशक्य असल्याचे वातावरण निर्माण झाले. त्यातूनच महापालिकेवर काही महिने प्रशासक येणार असल्याची चर्चा सुरू झाली.

गेले पंधरा दिवस करोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. सरकारी व खासगी कार्यालये सुरू झाली आहेत. यामुळे निवडणूकीची प्रक्रिया सुरू करण्याबाबत आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागितले होते. त्यानुसार निवडणूक प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचा आदेश आयोगाने दिला आहे. यामुळे मतदार यादी तयार करण्याचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे.

एकसदस्यीय प्रभाग या पद्धतीने ही निवडणूक होणार आहे. महापालिकेत ८१ सदस्य असून त्यामध्ये ४१ जागा महिलासाठी आरक्षित आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी केलेली मतदार यादी तयार आहे. त्यानुसारच प्रभाग रचना करण्यात येणार आहे. हे काम तातडीने सुरू होणार असल्याने निवडणूकीची रणधुमाळी या महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. मतदार यादी व प्रभाग रचनेचे काम वेळेत होणार की, त्याला उशिर लागणार यावरच काही दिवसासाठी प्रशासकाची नियुक्ती होणार की नाही हे अवलंबून राहणार आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

degree exam cet clash: सीईटी परीक्षार्थींसाठी ‘आयडॉल’ची स्वतंत्र परीक्षा – final year exam cet clash, idol’s separate test for cet candidates

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई सीईटी परीक्षा आणि 'आयडॉल'ची परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार होते. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित...

Oppo A33 (2020): ओप्पोचा जबरदस्त स्मार्टफोन Oppo A33 भारतात लाँच, पाहा किंमत-फीचर्स – oppo a33 (2020) with triple rear cameras, 5,000mah battery launched in...

नवी दिल्लीः ओप्पोने भारतात आणखी एक जबरदस्त स्मार्टफोन Oppo A33 भारतात लाँच केला आहे. ज्यात ४ कॅमेरे आहे. तसेच 5000 mAh बॅटरी दिली...

Shiv Sena on Narendra Modi: मोदी अध्यात्माच्या मार्गाने निघालेले दिसतात; ‘त्या’ भाषणामुळं शिवसेनेला शंका – shivsena taunts governor koshyari over pm narendra modi speech

मुंबई: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरामोहरा अलीकडच्या काळात बदलला आहे. दाढी वाढली आहे. त्यांच्या चेहऱ्यावर वेगळे तेज दिसत आहे. एक तर ते अध्यात्माच्या...

Recent Comments