Home शहरं कोल्हापूर Kolhapur News: आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह आठ जणांवर गुन्हा - eight accused,...

Kolhapur News: आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह आठ जणांवर गुन्हा – eight accused, including wife, for committing suicide


म टा प्रतिनिधी, कोल्हापूर लग्नात झालेल्या खर्चाची रक्कम देण्याचा तगादा लावून राहुल उर्फ कीर्तीकुमार राजेंद्र मनोहरे ( वय २६ रा…

Updated:

MT

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लग्नात झालेल्या खर्चाची रक्कम देण्याचा तगादा लावून राहुल उर्फ कीर्तीकुमार राजेंद्र मनोहरे ( वय २६ रा. कदमवाडी) याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. नम्रता कीर्तीकुमार मनोहरे, अभय मोतिराम गायकवाड, शालू नेताजी सूर्यवंशी, नेताजी पांडुरंग सूर्यवंशी, प्रवीण सुनील सूर्यंवंशी, सुनील पांडुरंग सूर्यंवंशी, आनंद भानुदान कांबळे, शिवाजी महादेवराव माने (सर्व रा. मदनसुरी, ता. निलंगा, जि. लातूर) अशी त्यांची नावे आहेत.

या प्रकरणी राजेंद्र मनोहरे (वय ५३ रा. साळुंखे मळा, कदमवाडी) यांनी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी सांगितले की, नम्रता मनोहरे आणि संशयित अभय गायकवाड यांच्यात प्रेमसंबध होते. या कारणावरून मृत राहुल हा पत्नी नम्रता हिला नांदवण्यास नकार दिला होता. त्या कारणावरुन दोघांत वादावादी सुरू होती. नम्रता हिच्या माहेरच्या लोकांनी लग्नात झालेला खर्च देण्याचा तगादा लावला होता. त्यासाठी त्याला वारंवार फोनवरून धमकी दिली जात होती. पत्नीला नांदवून घेण्यासाठी अनेकदा धमकी देऊन मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून कीर्तीकुमार याने १३ एप्रिल रोजी राहत्या घरी तिसऱ्या मजल्यावरील खोलीतील लोखंडी पाइपला नॉयलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतला होता. संबधित आठ जणांमुळे राहुल याने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

 

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा





Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण: एनसीबीकडून आरोपपत्र दाखल, रिया आणि शौविकही आरोपी – ncb files chargesheet against 33, including rhea chakraborty sushant singh rajput drugs...

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी एनसीबीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. तीस हजार पानांचं हे आरोपपत्र असल्याची माहिती समोर आली...

motorola moto g10: Moto G10 आणि Moto G30 ची लवकरच होणार भारतात एन्ट्री, कंपनीने शेयर केला टीजर – moto g10 and moto g30 india...

हायलाइट्स:मोटोरोला कंपनी दोन बजेट स्मार्टफोन भारतात लाँच करणार Moto G10 आणि Moto G30 असे स्मार्टफोनचे नाव याआधी मोटोरोला कंपनीने या फोनला युरोपमध्ये...

Aurangabad Corona Update: Coronavirus : दोन मृत्यू, ३५७ नवे बाधित – aurangabad reported 357 new corona cases and 2 deaths in yesterday

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादशहरातील शिवाजीनगर येथील ८३ वर्षीय, तर जालना जिल्ह्यातील तळणी येथील ६० वर्षीय, अशा दोन बाधित पुरुष रुग्णांचा उपचारादरम्यान घाटीत मृत्यू...

Recent Comments