Home शहरं कोल्हापूर Kolhapur News : करोनामुक्त झालेल्या तिघांना डिस्चार्ज - discharge the three who...

Kolhapur News : करोनामुक्त झालेल्या तिघांना डिस्चार्ज – discharge the three who were coronated


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सलग चौदा दिवसांच्या उपचारानंतर, सलग दोन स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर सीपीआर रुग्णालयातून करोनामुक्त झालेल्या तिघांना डिस्चार्ज देण्यात आला. भुदरगड तालुक्यातील आकुर्डे, शहरातील कनान नगरातील व्यक्ती आणि आंध्र प्रदेशाकडे जाणाऱ्या प्रवाशाचा डिस्चार्ज झालेल्या रुग्णांमध्ये समावेश आहे. दरम्यान, दिवसभरात १३४४ व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले असून १७३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

डिस्चार्ज झालेले तिन्ही प्रवाशी मुंबईहून कोल्हापूरात आले होते. आजअखेर ३५ जणांना करोनाची बाधा झाली असून त्यापैकी १३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून २२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, मुंबई, पुण्याहून मोठ्या संख्येने नागरिक येत असून त्यांची तपासणी केली जात आहे. आज २३०४ प्रवाशांपैकी १२४४ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. सीपीआरमध्ये २९६, आयजीएम इचलकरंजीत ३७, डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये २८७, चंदगड कोविड तपासणी सेंटरमध्ये ९९, आजऱ्यात १५१, राधानगरीत १५५, भुदरगडात १०१, शाहूवाडीत ४३ तर शिरोळमध्ये १४ जणांचे स्वॅब तपासण्यासाठी घेण्यात आले आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

जाता जाता : या, बसा डोक्यावर…

परवा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जिंकलेल्या आपल्या नवऱ्याला डोक्यावर घेऊन निघालेल्या एक उत्साही वैनी बघितल्या आणि जीव धन्य जाहला... हल्ली व्हॉट्सअप विद्यापीठामुळं जगभरातल्या अशा मनमौजेच्या...

coronavirus vaccine updates: करोना लसीकरण: जगाला मिळणार दिलासा; अमेरिका घेणार ‘हा’ निर्णय – coronavirus vaccine news america will join the global corona virus vaccine...

जिनिव्हा: जगभरात करोनाचे थैमान सुरू असून अनेक देशांमध्ये लसीकरणही सुरू झाले आहे. करोनाच्या वाढत्या थैमानाचा सामना करणाऱ्या जगातील गरीब, विकसनशील देशांना मोठा दिलासा...

Recent Comments