Home शहरं कोल्हापूर Kolhapur News : कोल्हापूर रेडझोनचा निर्णय सरकार घेणार - kolhapur red zone...

Kolhapur News : कोल्हापूर रेडझोनचा निर्णय सरकार घेणार – kolhapur red zone will be decided by the government


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबई आणि पुण्यातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असून त्यामुळे जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा ऑरेज झोनमधून रोड झोनमध्ये जाण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य स्तरावरील समिती घेणार आहे. जिल्हा प्रशासन याबाबत कोणताही निर्णय घेणार नाही, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

‘मुंबई आणि पुण्यातून नागरिक जिल्ह्यात परतत असून त्याचा ताण प्रशासनावर पडू लागला आहे,’ असे सांगून जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, ‘जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नागरिकांची नाक्यावर तपासणी करुन त्यांची आरोग्य तपासणी सीपीआर, डी. वाय. पाटील हॉस्पिटल, आयसोलेशन आणि प्रत्येक तालुक्यातील कोविड सेंटरवर होते. मुंबई, पुण्यासह रेडझोनमधील प्रत्येकाचा स्वॅब घेण्यात येतो. त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करण्यात येते. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असल्याने स्वॅब घेणे आणि त्यांचे अहवाल येण्यास थोडा विलंब होत आहे. त्यामुळे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये नागरिकांना दोन ते चार दिवस ठेवणे हे धोकादायक आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मुंबई, पुण्यासह रेडझोनमधील नागरिकांना कोल्हापूरात सोडू नये अशी विनंती रेडझोनमधील जिल्हा प्रशासनाला करण्यात आली आहे.’

‘दररोज एक हजार स्वॅबची तपासणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे,’ अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. ‘त्यासाठी तीन नवीन मशिन घेतली असून त्यातील एक स्वॅब तपासणीचे मशिन अॅटोमॅटिक असून ते दिवसाला सहाशे स्वॅबची तपासणी करून अहवाल देते. त्यामुळे निगेटिव्ह आलेल्या व्यक्तींना त्यांच्या गावात होम क्वारंटाइन आणि इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करण्यास मदत होणार आहे. स्वॅब घेणाऱ्यांना नागरिकांना फक्त एक ते दोन दिवस इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये रहावे लागेल,’ असेही त्यांनी सांगितले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

second side of farm loan waiver: कर्जमाफीची दुखरी बाजू – devidas tuljapurkar article on second side of farm loan waiver

देविदास तुळजापूरकरकृषी कायद्याच्या विरोधातील आंदोलनाचे पडसाद सर्वत्र उमटत असताना, याच घटकांशी संबंधित; परंतु सर्वस्वी वेगळ्या आणि सर्वार्थाने देशव्यापी अशा एका प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा...

sushant singh rajput latest news: Sushant Singh Rajput: ‘भाजप सुशांतसिंहच्या आत्म्याला मोक्ष मिळू देत नाही’ – bjp does not allow sushant singhs soul to...

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूचा राजकीय उपयोग करणाऱ्या भारतीय जनता पार्टीने अद्यापही त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळू दिली नाही, असे म्हणत महाराष्ट्र प्रदेश...

Sambhaji Bidi: ७० वर्षांनंतर संभाजी बिडीचे नाव बदलले, आता या नावाने विक्री करणार – sambhaji bidi to be disappeared, company change product name

म.टा. प्रतिनिधी, नगर: विविध संघटनांनी वेगवेगळ्या माध्यामातून केलेल्या विरोधाची दखल घेत विडी उत्पादक साबळे वाघीरे आणि कंपनीने संभाजी विडीचे नामांतर साबळे विडी केले...

Recent Comments