Home शहरं कोल्हापूर Kolhapur News : गर्दीवर नियंत्रणासाठी पथके - crowd control squads

Kolhapur News : गर्दीवर नियंत्रणासाठी पथके – crowd control squads


कोल्हापूर टाइम्स टीम

गेल्या ४० दिवसापासून बंद असलेली दुकाने राज्य सरकारच्या मान्यतेनंतर ऑरेज झोनमध्ये असल्याने सोमवारी सुरू झाली. मात्र, येथे प्रमाणापेक्षा अधिक गर्दी झाली. शहर पूर्वपदावर आल्याचे चित्र सर्रास पहावयास मिळाले. गर्दी रोखण्यासाठी अतिक्रमण, अग्निशमन दल व इस्टेट विभागाचे अधिकारी, कर्मचारी प्रत्येक रस्त्यावर फिरस्ती करत होते. नऊ गाड्यांच्या माध्यमातून सुरक्षित वावर ठेवण्याच्या सूचना अनाउसिंगद्वारे दिल्या जात होत्या. दरम्यान, गर्दीवर नियंत्रणासाठी महापालिकेने पाच पथकांची स्थापना केली आहे. ही तयारी केली असली तरी काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे दिसत होते.

शुक्रवारी केंद्र सरकारने ऑरेंज, ग्रीन झोनमध्ये अटी व शर्तीनुसार सोमवारपासून व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र रविवारी रात्री उशीरापर्यंत राज्य सरकारचा कोणताही आदेश जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचला नव्हता. तरीसुद्धा शनिवारी सकाळपासूनच शहरातील काही दुकाने सुरू झाली. तर काही दुकानदारांनी दुकाने सुरू करण्यासाठी पूर्वतयारी केली. शनिवारी आणि रविवारी शहरात सर्वत्र नागरिकांचा वर्दळ वाढल्याचे दिसले. अनेक मुख्य रस्त्यांवर नेहमीसारखी गर्दी झाली. सार्वजनिक वाहतूक वगळता सर्व वाहने रस्त्यावर असल्याने सोमवारी गर्दीत भर पडण्याचे संकेत महापालिका प्रशासनाला मिळाले होते.

रविवारी रात्री उशीरापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्स सुरू होती. कॉन्फरन्सनंतर त्यांनी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सूचना केल्या होत्या. त्यानुसार आयुक्तांनी चारही विभागीय कार्यालयीन प्रमुखांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार नियंत्रण ठेवण्यासाछी पाच पथकांची नियुक्ती केली. पथक सकाळपासून सायंकाळपर्यंत शहरातील विविध भागात फिरती करणार आहे. फिरती दरम्यान सुरक्षित वावराबाबतच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यास कारवाई केली जाईल.

त्याचबरोबर अतिक्रमण, अग्निशमन, इस्टेट, परवाना विभागाचे अधिकारी व कर्मचारी स्वतंत्रपणे पाहणी करत होते. राज्य सरकारच्या यादीबाहेरील दुकाने सुरू असल्यास ते बंद करण्याची कार्यवाही पथकांकडून केली जात होती. सरकारच्या निर्देशानुसार सलग पाच दुकाने सुरू करण्यास मज्जाव असला, तरी अनेक ठिकाणी एकाच प्रकारची पाच दुकाने सुरू असल्याचे दिसत होते. येथे पथकातील कर्मचाऱ्यांना कारवाई करताना अडचणींना सामोरे जावे लागले. एकीकडे पथक शहरातील विविध रस्त्यावर फिरत असताना आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनीही अनेक भागात पाहणी केली.

सुरक्षित वावर, मास्क व हँडग्लोजचा वापर आदी सूचना देण्यासाठी प्रशासनाने चार रिक्षा भाडेतत्वावर घेतल्या आहेत. याद्वारे नागरिकांचे प्रबोधन केले जात असून त्यात अग्निशमन विभागाच्या पाच गाड्यांचाही समावेश केला आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास कारवाई करण्याचा इशारा वारंवार दिला जात होता. परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत अशाच पद्धतीने नियंत्रण ठेवण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

पॉइंटर

– अग्निशमन विभागाच्या पाच गाड्या व चार रिक्षातून अनाउन्सिंग

– अतिक्रमण विभागाचे स्वतंत्र गस्ती पथक

– विभागीय कार्यालयानुसार जबाबदारी निश्चित

– अधिकारी व प्रभाग समिती सचिवांमध्ये समन्वय

गर्दी वाढल्याने कोंडी

लॉकडाउन जाहीर झाल्यापासून अनेकजण विनाकारण घरातून बाहेर पडत होते. पोलिसांनी मज्जाव केल्यास विविध कारणे सांगून पळवाट शोधत होते. त्याची पुनरावृत्ती आजही दिसून येत होती. दुकाने सुरू झाल्याने लॉकडाउनमध्ये शिथिलता दिल्यासारखी स्थिती झाली आहे. त्याचा फायदा घेत अनेकांना घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यावर नागरिकांची मोठी वर्दळ दिसत होती.

राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दुकाने सुरू करण्यात आली आहेत. दुकानांमध्ये गर्दी होऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना रविवारी रात्रीच दिल्या आहेत. तसेच नियंत्रण ठेवण्यासाठी पथकांची स्थापना केली आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास प्रशासनाच्यावतीने कारवाई करण्यात येणार आहे.

– डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आयक्तSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांच्या घराजवळ बेवारस कारमध्ये स्फोटके आढळल्याने खळबळ – abandoned car near mukesh ambanis residence antilia triggers bomb scare

हायलाइट्स:मुंबईत मुकेश अंबानी यांच्या घराजवळ बेवारस कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या.कंबाला हिल भागातील अँटिलिया टॉवरजवळ पोलीस बंदोबस्त वाढवला.राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घटनेची घेतली गंभीर...

fake stamps fraud in nashik: बनावट मुद्रांकाबाबत आणखी तक्रारी – fraud on the basis of fake stamps in nashik

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक/ कळवणदेवळा तालुक्यात बनावट मुद्रांकाच्या आधारे फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले असताना अन्य काही ठिकाणी देखील अशा प्रकारे फसवणूक...

stones pelted at dalit mans wedding party: फेटे घातले आणि डीजे लावल्याच्या रागातून दलिताच्या वरातीवर दगडफेक – accused objected wearing safa stones pelted at...

अहमदाबादः गुजरातमधील अरावली जिल्ह्यात एका दलिताच्या लग्नाच्या वरातीवर एका जमावाने दगडफेक केली. तसंच वरात नेण्यास आणि डीजे वाजवण्यावरून धमकीही दिली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी...

Recent Comments