Home शहरं कोल्हापूर Kolhapur News : जप्त वाहने आजपासून देणार - seized vehicles will be...

Kolhapur News : जप्त वाहने आजपासून देणार – seized vehicles will be handed over from today


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लॉकडाऊनमध्ये संचारबंदीचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी सात हजार वाहने जप्त केली आहेत. ही वाहने परत मूळ मालकांना सोमवारपासून (ता. ४) देण्यात येणार आहेत. पोलिसांनी वाहने देण्याचे वेळापत्रक जाहीर केले असून वाहन मालकांना मेसेज पाठवण्यात आले आहेत.

लॉकडाउनच्या काळात शहर वाहतूक नियंत्रण शाखेने ३९९५ तर अन्य जुना राजवाडा, करवीर, शाहूपुरी, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी पोलिसांनी तीन हजार वाहने जप्त केली आहेत. ही सर्व वाहने पोलिसांनी एकत्र ठेवली असून सोमवारपासून ती देण्यात येणार आहेत. पोलिस कवायत मैदानावर सकाळ आणि दुपारच्या सत्रात प्रत्येकी अडीचशे वाहने परत देण्यात येणार आहेत. एक ते एक हजार, एक हजार ते दोन हजार यामधील क्रमांक असलेल्या वाहनांचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. सोमवारी एक ते एक हजार क्रमांकमध्ये असलेली वाहने परत देण्यात येणार आहे. वाहनचालकांकडून दंड भरून घेण्यात येणार आहे. वाहन ताब्यात देताना लायसन, वाहनाची मूळ कागदपत्रे, आधारकार्ड तपासले जाणार आहे. त्यानंतर मूळ मालकांकडे वाहने देण्यात येणार आहे. वाहन परत देताना पोलिसांकडून सुरक्षित वावर असलेल्या नियमांचे कडक पालन करण्यात येणार आहे. वाहनांच्या मूळ मालकांनी मास्क तोंडाला लावून येण्यास सांगितले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Aurangabad Municipal Corporation: विनामास्क १२०० नागरिकांना दंड – aurangabad municipal corporation has action against 1200 citizens for wearing not mask

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद'मास्क घाला, करोना टाळा', असे आवाहन केले जात असताना विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढतच आहे. करोना आजाराचे गांभीर्य नसलेल्या व्यक्ती...

jee main march 2021: JEE Main 2021 परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; परीक्षा कधी? वाचा – jee maim march exam 2021 application process begins at...

JEE Main 2021: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) फेब्रुवारी सत्राच्या जेईई मेन २०२१ परीक्षेची उत्तरतालिका तसेच जेईई मेन मार्च 2021 (JEE Main March 2021)...

poco f3 to launch globally: Poco F3 होणार रेडमी K40 चे रिब्रँडेड व्हर्जन, लवकरच होणार भारतात लाँच – poco f3 to launch globally as...

हायलाइट्स:Poco F3 स्मार्टफोनला भारतात लाँच करण्याची शक्यता Poco F3 होणार रेडमी K40 चे रिब्रँडेड व्हर्जनफोनमध्ये 1080x2400 पिक्सल रेजॉलूशन नवी दिल्लीः Poco F3 लवकरच...

Recent Comments