Home शहरं कोल्हापूर Kolhapur News : जिल्ह्यात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन - lockdown in the...

Kolhapur News : जिल्ह्यात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन – lockdown in the district till may 31


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात ३१ मेपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रविवारी सायंकाळी काढला. या कालावधीत जिल्ह्यात बंदी आदेश राहणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातून रविवारअखेर १७ हजार परप्रांतीय त्यांच्या राज्याकडे रवाना झाले आहेत.

जिल्हाधिकारी देसाई यांनी लॉकडाउनच्या आदेशामध्ये यापूर्वी घालण्यात आलेले निर्बंध व सूट देण्यात आलेल्या बाबी कायम ठेवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात यापूर्वी जिल्हा प्रशासन, महानगरपालिकेने दिलेले नियम आणि अटीनुसार व्यवसाय आणि उद्योग सुरू राहणार आहेत. दरम्यान, रविवारअखेर कोल्हापुरातून १७ हजार ६६७ मजूर परराज्यात रवाना झाले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक १० हजार ८९२ उत्तर प्रदेशमधील आहेत. बिहारकडे चार हजार २३२, मध्यप्रदेशकडे १०६६ आणि राजस्थानकडे १४७७ मजूर परतले आहे

रविवारी दुपारी एक वाजता जिल्ह्यातील १४५६ मजुरांना घेवून रेल्वे बिहारमधील मोतीहारीकडे रवाना झाले. आपत्ती व्यवस्थापन समितीचे स्वयंसेवक शुभांगी घराळे, कृष्णात सोरटे, सुनील कांबळे, स्वाती सपकाळे यांच्या हस्ते झेंडा दाखवून रेल्वे मार्गस्थ करण्यात आली. तर सायंकाळी सहा वाजता १३४८ मजुरांना घेवून उत्तर प्रदेशमधील बलियाकडे रवाना झाली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

violence at red fort in delhi: tractor rally violence : लाल किल्ल्यावर झेंडा लावणारा तरुण तरण तारणचा, तीन मुलींसह आई-वडील बेपत्ता – violence at...

भिखविंड (तरण तारण) : दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर परेड दरम्यान लाल किल्ल्यावर झेंडा ( violence at red fort ) लावणारा जुगराज सिंग हा तरुण...

Recent Comments