Home शहरं कोल्हापूर Kolhapur News : जुन्याच योजना शेतकऱ्यांच्या माथी - the old scheme is...

Kolhapur News : जुन्याच योजना शेतकऱ्यांच्या माथी – the old scheme is on the farmers


कोल्हापूर टाइम्स टीमकरोनासारख्या महामारीमध्ये शेतकरी आणि शेतमजुरांना दिलासा देण्यासाठी कोट्यवधी रुपयांची घोषणा नुकतीच झाली. पण जाहीर झालेल्या सर्व योजनांचा समावेश चार महिन्यांपूर्वीच्या अर्थसंकल्पामध्ये दिसून येतो. जुन्याच योजना नव्या स्वरुपात मांडल्या असून त्या सर्व फसव्या आहेत. कोल्डस्टोरेजसारख्या योजनेची प्रभावी अंमलबजा‌वणी करण्यासाठी सक्षम यंत्रणा आवश्यक आहे. लॉकडाउनमध्ये संपूर्ण देशाला भाजीपाला आणि अन्नधान्याचा पुरवठा शेतकऱ्यांना केला असला, तरी अनेकजणांना मार्केटपर्यंत पोहोचता आले नाही. या काळात सर्वात जास्त फटका शेतकरी आणि शेतमजुरांना बसला आहे. शेतमजुरांना रोजगार निर्माण करुन देण्यासाठी ‘मनरेगा’मध्ये त्यांना सामावून घेण्याची आवश्यकता होती. यामुळे शेतकऱ्यांची मुजर टंचाई प्रश्न निकाला निघाला असता, तसेच शहरातून परतलेल्या नागरिकांना स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण झाला असता. मत्स्य, डेअरी, पशूनधन आणि प्रक्रिया उद्योगांसाठी त्यांनी आकड्याद्वारे भरीव तरतूद केल्याचे दिसते. या सर्व तरतुदी अर्थसंकल्पामधील आहेत. प्रक्रिया उद्योगांसाठी पाठवलेले अनेक प्रस्ताव सरकारी कार्यालयात धूळ खात पडलेले आहेत. अशावेळी नवीन योजना जाहीर करुन त्यातून फारसा काही फायदा शेतकऱ्यांना होईल असे दिसत नाही. त्याचवेळी जीवनाश्यक वस्तू कायद्यात केलेली सुधारणा शेतकऱ्यांना फलदायी ठरेल. कृषीमालाची बाजारपेठे रेलचेल झाल्यानंतर दर कमी होण्याचे नेहमीच प्रसंग उद्भवतात. यातून त्यांची सुटका करण्यासाठी पुन्हा एकदा कोल्डस्टोरेज उभारणीचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना तालुकास्तरापर्यंत जाण्यांचा त्यांचा प्रयत्न दिसतो. असे झाल्यास शेतकऱ्यांना कृषीमाल साठवण्याची संधी मिळेल. मात्र प्रत्यक्षात ही योजना अंमलात आणण्यासाठी सक्षम यंत्रणा उभा करण्याची गरज आहे.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pune phd student murder latest news: Pune Crime: पुण्यात पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्याचा खून; चेहरा दगडाने ठेचला – 30 year old phd student murdered...

पुणे: पुणे येथील पाषाण भागातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (एनसीएल) येथे पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक...

latest opinion poll 2021: Opinion Poll: मोदी-शहांचे आव्हान परतवत ममता साधणार हॅट्ट्रिक!; दक्षिणेतील ‘या’ राज्यात सत्तांतर? – tmc to retain bengal ldf headed for...

हायलाइट्स:पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी हॅट्ट्रिक साधण्याची शक्यता.आसाम भाजपकडे राहणार तर पुदुच्चेरीत कमळ फुलणार.तामिळनाडूत स्टॅलिन तर केरळात डाव्यांची जादू दिसणार.नवी दिल्ली: पश्चिम बंगाल, आसाम,...

Amravati lockdown news: Amravati Lockdown: अमरावती, अचलपुरात लॉकडाऊन वाढवला; ‘हे’ शहरच कंटेन्मेंट झोन! – lockdown in amravati achalpur extended till march 8

हायलाइट्स:अमरावती विभागात अनेक शहरांत करोनाचे थैमान.अमरावती व अचलपूरमध्ये लॉकडाऊन वाढवला.नागपुरातील स्थिती गंभीर, लॉकडाऊन लावला जाण्याची शक्यता.अमरावती: विदर्भात सध्या अमरावतीमध्ये करोनाने थैमान घातले असून...

Recent Comments