Home शहरं कोल्हापूर Kolhapur News: दुचाकीवरुन एक व्यक्ती; चारचाकीत दोघांनाच परवानगी - one person on...

Kolhapur News: दुचाकीवरुन एक व्यक्ती; चारचाकीत दोघांनाच परवानगी – one person on a bike; both wheels allowed


कोल्हापूर टाइम्स टीमसंचारबंदीच्या काळात अत्यावश्यक व जीवनावश्यक बाबींसाठी दुचाकी व चारचाकी प्रवासाला सूट दिली आहे…

Updated:

MT

कोल्हापूर टाइम्स टीम

संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक व जीवनावश्यक बाबींसाठी दुचाकी व चारचाकी प्रवासाला सूट दिली आहे. पण आता या दुचाकीवरुन दोघांना फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. चारचाकीमध्येही चालवणाऱ्यासह एकाच व्यक्तीला प्रवस करता येणार आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, ‘राज्य सरकारने सोमवारपासून उद्योगधंदे, व्यवसाय तसेच कार्यालये काही प्रमाणात सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत.मंत्रालय तसेच इतर सरकारी कार्यालयामधील काही कर्मचारी गावामध्ये आले आहेत. अशा कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या मूळ कार्यालयात हजर व्हायचे असेल तर त्याची परवानगीही संबंधित तहसिलदार कार्यालयाकडून मिळेल. संचारबंदीमध्ये अत्यावश्यक तसेच जीवनावश्यक बाबींसाठी नजिकच्या ठिकाणी जाण्यासाठी दुचाकी तसेच चारचाकीमधील प्रवासाला सूट देण्यात आली आहे. परंतु दुचाकी चालवणारा एक आणि त्याच्या पाठीमागे दुसरी व्यक्ती आढळून येत आहे. सरकारच्या सूचनेनसुार अशा दुचाकीवर दोघांना प्रवास करण्यास पूर्णत: बंदी घातली आहे. अत्यावश्यक कारणाने चारचाकीचा वापर करताना चालवणारी व्यक्ती आणि पाठीमागील सीटवर बसणारी एक व्यक्ती अशा दोनच व्यक्ती बसून चारचाकी वापरु शकतात. याचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.’

 

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Pravin Darekar: Maha Vikas Aghadi Government Orders Audit Of Mumbai Bank For Alleged Financial Mismanagement – मुंबई बँक कथित घोटाळा : दरेकर यांच्या अडचणींत...

म. टा. प्रतिनिधी, मुंबईअर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, मंगळवारी, मुंबई बँकेतील कथित घोटाळ्याची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या सहकार विभागाने घेतला. यामुळे...

दुहीच्या बंदुका

राजकारणाचा स्तर किती खालावत चालला आहे, याची प्रचीती सध्या दर दिवसागणिक येते. अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वैधानिक विकास मंडळांच्या नियुक्त्यांवरून सत्ताधारी आणि विरोधी...

Recent Comments