Home शहरं कोल्हापूर Kolhapur News : नऊ चालक, प्रवाशांवर गुन्हे - nine drivers, crimes on...

Kolhapur News : नऊ चालक, प्रवाशांवर गुन्हे – nine drivers, crimes on passengers


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मालवाहतूक करणाऱ्या वाहनातून बेकायदेशीर आणि धोकादायक प्रवासी वाहतूक करणाऱ्या आणि प्रवास करणाऱ्या नऊजणांवर पेठवडगाव आणि शाहूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले. यामध्ये चालक आणि प्रवाशांचा समावेश आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन सुरू असून फक्त जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने रस्त्यांवर धावत आहेत. पोलिसांकडून जिल्ह्यात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर पोलिस चौक्या असून वाहनांची तपासणी केली जात आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनातून एक चालक, अतिरिक्त चालक आणि एक क्लिनर अशा तिघांना परवानगी आहे. पण चालकांकडून प्रवाशांची वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कसून तपासणी केली जात आहे. पोलिसांनी अशा वाहनचालक, क्लिनर आणि प्रवाशांवर गुन्हे नोंदवले आहेत.

पेठवडगाव पोलिस ठाण्यात संशयित महमंद शफिक अहमद (वय ५०, वाशी नाका, चेंबूर), इब्रार अहमद आशिक अली (वय ४०, रा. भदईपूर, छितपालगड, प्रतापगड), महमंद करीम मुनवर शरीफ अहमद (वय ३७), (वय ४०), संदीप सूर्यवंशी (वय ४२), अनिल पाटील (वय २५) यांच्यावर एकत्रित प्रवास केल्याचा गुन्हा नोंद वडगाव पोलिस करण्यात आला.

शाहूवाडी पोलिस ठाण्यात करोना रुग्णांला घेऊन ट्रकमधून प्रवास करणाऱ्या मल्लेश मरिअप्पा (वय ४५), संजीवा यादव (वय २५), हनुमंता यादव (वय ४६, तिघे रा. सन ऑफ अंजनिया) व चालक रमेश (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) या संशयितांवर गुन्हे दाखल झाले.

तीन दिवसांत १३ हजार वाहनांचा प्रवास

गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात १३ हजार २१८वाहनांनी जिल्ह्यात प्रवेश केला. त्यापैकी ६४६१ इतकी वाहने जिल्ह्याच्या सीमेबाहेर गेली. ६७४९ इतकी वाहने जिल्ह्यात आली आहेत. तपासणी नाक्‍यावर सर्व वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. अटीचे पालन न करता प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Subodh Bhave Post For Gayatri Datar On Instagram See Funny Comment – ‘सेटवर कसा असतो गायत्री सोबतचा सीन’ सुबोध भावेच्या गंमतीशीर पोस्टवर कमेंटचा पाऊस...

हायलाइट्स:गायत्री दातारनं सुबोध भावेच्या 'तुला पाहते रे' या मालिकेतून केलं होतं अभिनय क्षेत्रात पदार्पणसुबोध भावेनं गायत्रीसाठी लिहिली गंमतीशीर पोस्टसुबोध भावेच्या पोस्टवर चाहत्यांच्या धम्माल...

mhada authority: म्हाडाची प्रीमियम कपात केवळ २५ टक्के – mhada authority writes letter to maharashtra government over development premium

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोनाच्या साथीने गृहनिर्माण क्षेत्राला दिलेल्या दणक्यातून सावरण्यासाठी राज्य सरकारने विकासकांना प्रीमियम शुल्कात ५० टक्के सवलत जाहीर केली. त्यानुसार राज्यातील...

Recent Comments