Home शहरं कोल्हापूर Kolhapur News : पंतप्रधान विमा योजनेत ११ लाख जणांचा सहभाग - 11...

Kolhapur News : पंतप्रधान विमा योजनेत ११ लाख जणांचा सहभाग – 11 lakh people participate in the prime minister’s insurance scheme


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंतप्रधान सुरक्षा विमा आणि जीवन ज्योती विमा योजनेत जिल्ह्यातील ११ लाख ७२ हजार जणांनी सहभाग नोंदविला आहे. दोन्ही विमा योजनांच्या नूतनीकरणासाठी २५ मेपासून विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अग्रणी प्रबधक राहुल माने यांनी दिली आहे.

नूतनीकरण मोहीम २५ मे ते एक जून या कालावधीत राबविण्यात येणार आहे. देशामध्ये सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा प्रणाली अस्तित्वात आणण्यासाठी नऊ मे २०१५ रोजी गरीब व वंचित घटकांसाठी सामाजिक सुरक्षिततेसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा या दोन योजना सर्व बँकांच्या माध्यमातून सुरू केल्या आहेत. जिल्ह्यात प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत सात लाख ८० हजार बँक ग्राहकांनी तर जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत तीन लाख ९२ हजार ग्राहकांनी सहभाग नोंदविला आहे. यापुढील काळातही जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी त्यांचे बँक खाते असणाऱ्या बँकेत या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही माने यांनी केले आहे.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही अपघाती मृत्यू व अपंगत्व यासाठी दोन लाखापर्यंत विमा संरक्षण देणारी योजना असून वय वर्षे १८ ते ७० वयोगटातील व्यक्ती यामध्ये सहभाग घेवू शकतात. या योजनेचा वार्षिक हप्ता केवळ बारा रुपये आहे. तर जीवन ज्योती विमा योजना ही नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाखापर्यंत विमा संरक्षण देणारी योजना असून वय वर्षे १८ ते ५० वयोगटातील व्यक्ती यामध्ये सहभाग घेवू शकतात. या योजनेचा वार्षिक हप्ता ३३० रुपये आहे.

जिल्ह्यातील नागरीकांनी आपले खाते ज्या बँकेत आहे, त्या शाखेत, बँकेतर्फे नेमणूक करण्यात आलेल्या व्यवसाय समन्वयक व ग्राहक सेवा केंद्रात अर्ज करावा. तसेच पोस्ट बँकेत, पोस्ट ऑफिसमध्येही अर्ज करता येतो. जे ग्राहक योजनेपासून वंचित आहेत त्यांनी आपल्या बँक शाखेशी, व्यवसाय समन्वयक ग्राहक सेवा केंद्राशी किंवा पोस्ट ऑफिसशी संपर्क साधून या योजनांमध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहनही प्रबंधक माने यांनी केले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

violence at red fort in delhi: tractor rally violence : लाल किल्ल्यावर झेंडा लावणारा तरुण तरण तारणचा, तीन मुलींसह आई-वडील बेपत्ता – violence at...

भिखविंड (तरण तारण) : दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर परेड दरम्यान लाल किल्ल्यावर झेंडा ( violence at red fort ) लावणारा जुगराज सिंग हा तरुण...

Recent Comments