Home शहरं कोल्हापूर Kolhapur News: बॅरिकेड्सने जखडले शहर - a city surrounded by barricades

Kolhapur News: बॅरिकेड्सने जखडले शहर – a city surrounded by barricades


कोल्हापूर टाइम्स टीम

प्रभागांतील गर्दी आटोक्यात आणून, पर्यायाने करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने शहरात ६८ झोन केले आहेत. झोनमध्ये ४५० ठिकाणी बॅरिकेड्स लावून लहान-मोठे रस्ते ये-जा करण्यासाठी पूर्णत: बंद केले आहेत. दोन दिवसांपासून सुरू असलेली याची कार्यवाही रविवारी दुपारी संपली. या उपाययोजनेमुळे घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या कमी होणार का? हा औत्सुक्याच्या विषय बनेल.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन आणि त्यानंतर संचारबंदी घोषीत करण्यात आली. संचारबंदीच्या कालावधीतही नागरिक विविध कारणांनी बाहेर पडून गर्दी करत आहेत. गर्दीमुळे विषाणूचा संसर्ग वाढण्याची भीती असल्याने महापालिका विविध उपायोजना करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनाने प्रभागाच्या सीमा बंद करण्याचे आदेश महापालिकेला दिले. त्यानुसार शुक्रवार रात्रीपासून ही प्रक्रिया करण्यात आली. शनिवारी दिवसभर शहर अभियंता व उपशहर अभियंत्यांनी नगरसेवक, स्थानिक नागरिक आणि प्रभाग समितीच्या सदस्यांबरोबर चर्चा करुन सीमा निश्चित केल्या. पोलिसांची मदतही घेण्यात आली. ४० ठिकाणी बॅरिकेड्स लावले.

रविवारी उर्वरीत ठिकाणाचे स्पॉट निश्चित करताना अधिकाऱ्यांनी नकाशाचा आधार घेतला. नव्याने २८ झोन तयार करण्यात आले. ठिकाणे निश्चित करताना गावठाणामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यासाठी दोन ते तीन प्रभाग एकत्र करुन नवे स्पॉट ठरवले. त्यानुसार शहराच्या लहान-मोठ्या ४५० ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात बॅरिकेड्स प्रशासनाकडे नसल्याने कोल्हापूर जिल्हा मंडप डेकोरेशन असोसिएशनची मदत घेण्यात आली. तात्पुरत्या बॅरिकेड्ससाठी असोसिएशनकडून साहित्य घेण्यात आले. भाजी मार्केटमधील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच अशी वेळ निश्चीत करताना प्रत्येक प्रभागात दहा ते १५ विक्रेत्यांची नेमणूक केली. तरीही गर्दी होत राहिली. त्यामुळे नव्या उपाययोजना फलद्रुप ठरेल का? याचे उत्तर एक ते दोन दिवसांत मिळेल.

भाजी विक्रेत्यांची संख्या वाढली

लॉकडाउनच्या परिस्थितीमध्ये भाजीपाला खरेदी-विक्री वगळता बहुतांशी व्यवसाय पूर्णत: बंद आहेत. यामुळे मोलमजुरी करणाऱ्या व्यक्तींच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी अनेकांनी नव्याने भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यामुळे भाजीपाला विक्रेत्यांची संख्या वाढल्याचे महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

– तात्पुरत्या बॅरिकेड्ससाठी मंडप डेकोरेशनची मदत

– बाधित रुग्णांची ट्रॅव्हल हिस्ट्री रोखण्याचे प्रयत्न

– गावठाण भागात दोन ते तीन प्रभाग एकत्र

– गर्दी टाळण्यासाठी भाजी मार्केटची वेळ मर्यादीत

बंद केलेले प्रमुख मार्ग

रंकाळा, तांबट कमान (शिवाजी पेठ), साकोली कॉर्नर, दुधाळी, मिरजकर तिकटी, नाथागोळे तालीम, खरी कॉर्नर, महाद्वार रोड, टेंबे रोड, सीपीआर चौक, सिद्धार्थ नगर, तोरस्कर चौक, व्हिनस कॉर्नर, गवत मंडई, शाहूपुरी दुसरी गल्ली, बागल चौक, संभाजी नगर, रंकाळा स्टँड, मोहिते कॉलनी, देवकर पाणंद, क्रेशर चौक.

विभागीय कार्यालयांतर्गत झोन

ताराराणी मार्केट : शुगर मिल, कसबा बावडा पूर्व, हुनमान तलाव, लाइन बाजार, लक्ष्मीविलास पॅलेस, पोलिस लाइन, भोसलेवाडी-कदमवाडी, कदमवाडी, शाहू कॉलेज, ताराबाई पार्क, नागाळा पार्क, रमण मळा, व्हीनस कॉर्नर, कनान नगर, शिवाजी पार्क, सदर बाजार, महाडिक वसाहत, मुक्तसैनिक वसाहत, शाहू मार्केट यार्ड, टेंबलाई वाडी.

छत्रपती शिवाजी मार्केट : विक्रम नगर, रुईकर कॉलनी, साईक्स एक्स्टेशन, शाहूपुरी तालीम, कॉमर्स कॉलेज, ट्रेझरी ऑफिस, सिद्धार्थ नगर, शिपुगडे तालीम, खोलखंडोबा, बाजार गेट, बिंदू चौक, महालक्ष्मी मंदिर, शिवाजी उद्यमनगर, यादव नगर, राजारामपुरी, पाटणे हायस्कूल, टाकाळा खण, राजारामपुरी एक्स्टेशन, दौलत नगर, प्रतिभा नगर.

बागाल मार्केट : पांजरपोळ, शास्त्रीनगर-जवाहर नगर, मंगेशकर नगर, कैलासगडची स्वारी, सिद्धाळा गार्डन, फिरंगाई, तटाकडील तालीम, रंकाला स्टँड, पंचगंगा तालीम, लक्षतीर्थ वसाहत, बलराम कॉलनी, दुधाळी पॅव्हेलियन, चंद्रेश्वर, पद्माराजे उद्यान, संभाजीनगर बस्थानक, नाथागोळे तालीम, संभाजीनगर, नेहरु नगर, जवाहर नगर, सुभाष नगर.

गांधी मैदान : बुद्धगार्डन, सम्राटनगर, शिवाजी विद्यापीठ, राजेंद्र नगर, स्वातंत्र्यसैनिक कॉलनी, रामनंद नगर-जरग नगर, कळंबा फिल्टर हाउस, तपोवन, राजलक्ष्मीनगर, रंकाळा तलाव, फुलेवाडी, फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरुजी वसाहत, आपटेनगर-तुळजाभवानी, साळोखे नगर, शासकीय मध्यवर्ती कारगृह, रायगड कॉलनी, सर्वेनगर, क्रांतीसिंह नाना पाटील नगर.

एखाद्या बाधित रुग्ण आढळल्यास त्यांच्या संपर्क आलेल्या व्यक्तींचा शोध घ्यावा लागतो. यंत्रणेवर ताण येण्याबरोबरच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. विविध कारणाने बाहेर पडणाऱ्या व्यक्तींचा प्रवास मर्यादीत राहण्यासाठी प्रशासन या उपाययोजन करत आहे.

– निखिल मोरे, उपायुक्त, महापालिका

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Indo Nepal border: नेपाळ पोलिसांकडून गोळीबार; एका भारतीयाचा मृत्यू, एक बेपत्ता – indian national killed, one missing after police firing by nepal police

हायलाइट्स:सीमेवर नेपाळ पोलीस आणि तीन भारतीय नागरिकांत बाचाबाचीएका भारतीय नागरिकावर नेपाळ पोलिसांचा गोळीबारझटापटी दरम्यान सीमा पार करण्यात यशस्वी ठरल्यानं एकाचा जीव वाचलातिसरा साथीदार...

All India Marathi Literary Meet: साहित्य संमेलन मेअखेरीस? – all india marathi literary meet program will be postpone in may month due to coronavirus

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकशहरात २६ ते २८ मार्च या काळात होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करोनाच्या पार्श्वभूमीवर मे महिनाअखेरपर्यंत पुढे ढकलण्याचा...

Violence against women: बलात्कारी डॉक्टर गजांआड – aurangabad municipal corporation has suspended to rapist doctor

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल महिलेला डिस्चार्ज देण्यासाठी केबिनमध्ये बोलावून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरला महापालिकेने गुरुवारी बडतर्फ केले. कोव्हिड केअर...

Recent Comments