Home शहरं कोल्हापूर Kolhapur News : रंकाळ्यातील जलचर मृत - rankala aquatic dead

Kolhapur News : रंकाळ्यातील जलचर मृत – rankala aquatic dead


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लॉकडाउनमध्ये थोडीशी शिथिलता दिल्यानंतर पुन्हा पंचगंगा नदी, रंकाळा तलावाच्या प्रदूषणास सुरुवात झाली आहे. जुना वाशी नाका परिसरात, राज कपूर पुतळ्यासमोर तलावात मासे, कासव आदी जलचर मृत झाले आहेत. तर काठावर परदेशी पक्षी मृतावस्थेत आहेत. शेजारी नारळांचा ढिगही आहे. तर पंचगंगा नदीघाटावर नैवद्य आणि निर्माल्याचा ढीग आहे. यामुळे दोन महिन्यांपासून प्रदूषण कमी झालेले प्रदूषण वाढण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत असून पंचगंगा नदी आणि रंकाळा तलाव पुन्हा अरिष्टात सापडण्याची शक्यता आहे.

कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालत असलेला रंकाळा तलाव अनेक दिवसांपासून प्रदूषणाच्या विळख्यात सापडला होता. महापालिका प्रशासनाने राज्य सरकारच्या निधीतून प्रदूषण कमी करण्यास यश मिळवले आहे. विशेषत: तलावाच्या पाणलोट क्षेत्रातील रहिवासी भागामध्ये ड्रेनेज लाइन टाकून प्रदूषण कमी केले आहे. मात्र, तरीही नाल्यातून थेट येणाऱ्या सांडपाण्यामुळे प्रदुषणाचा मुद्दा चर्चेला येतो. पण गेल्या दोन महिन्यांपासून तलावाच्या प्रदूषणामध्ये कमालीची घट झाली. नेहमी पाण्यावर दिसणारा हिरवा तंवगही नाहीसा झाला. लॉकडाउनमुळे प्रदूषणास कारणीभूत घटक कमी झाल्याने पाणी स्वच्छ झाले होते. पण गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा तलावातील पाणी प्रदूषित होऊ लागले आहे.

जुना वाशीनाका परिसरातील राज कपूर पुतळ्यासमोरील बागेजवळ मृत माशांचा खच पडला आहे. त्यामध्ये कासव व पाणसापही दिसून आले आहेत. परदेशी पक्षीही मोठ्या प्रमाणात काठावर मृत झाले आहेत. काही नागरिकांनी मृत साप अन्यत्र टाकले. एवढ्या मोठ्या प्रमाणात जलचर मृत झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काही नागरिकांनी मृत मासे घरी घेऊन जाणे पसंद केले.

मोठ्या प्रमाणात जलचर मृत झाले असताना काठावर शेकडो नारळ पडले आहेत. रंकाळ्यामध्ये नेहमीच खण-नारळ सोडले जातात. पण सद्य:स्थितीत पडलेल्या नारळांची संख्या जास्त असल्याने फिरायला येणारेही अचंबित झाले आहेत. नारळासोबत हळद-कुंकू, देवांच्या फुटलेल्या फोटोंच्या फ्रेम आदी साहित्य पडले आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर कडक संचारबंदी लागू करण्यात आली. पण दोन दिवसांपूर्वी त्यामध्ये शिथिलता दिल्यानंतर तलावाच्या प्रदूषणामध्ये वाढ होऊ लागली आहे.

याबाबत चिंता व्यक्त करताना ‘अंनिस’च्या कार्यकर्त्या गीता हासुरकर म्हणाल्या, ‘रंकाळ्याचे प्रदूषण कमी करण्यासाठी नेहमीच प्रशासनासोबत वाद होतो. पण समाजालाही आपल्या कर्तव्यांचा विसर पडल्याचे दिसते. बागेच्या काठाला असंख्य जलचर मरुन पडले आहेत. देवांच्या फोटोंच्या तुटलेल्या फ्रेम व काचांचा ढीग साचला आहे. जलचरांसोबत मोठ्या प्रमाणात परदेशी पक्षीही मेल्याचे दिसून येत आहे.’

पंचगंगा घाटावर नैवद्यांचा ढीग

गेल्या दोन महिन्यापासून अत्यंत स्वच्छ झालेल्या पंचगंगा नदीघाटाला शनिवारी ओंगळवाणे स्वरुप प्राप्त झाले होते. शुक्रवारी झालेल्या आमवस्येच्या पार्श्वभूमीवर घाटावर असंख्य नैवद्य ठेवले होते. निर्माल्याचा तर ढीग साचला होता. त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य होते. नदी प्रदूषणाबाबत नेहमीच प्रशासनाबरोबर संघर्ष करणाऱ्या दिलीप देसाई यांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी कोठेही तक्रार न करता थेट नैवद्य आणि निर्माल्य बाहेर काढण्यास सुरुवात केली. सोबतीला नदीबाबत जिव्हाळा असलेले सुमारे ५० कार्यकर्ते सहभागी झाले. त्यानंतर महापालिकेचेही कर्मचारी तातडीने दाखल झाले. त्यामुळे तासाभरात पुन्हा नदीघाट स्वच्छ झाला.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

spinning mills are in crisis: राज्यातील सूतगिरण्यांना घरघर; बड्या राजकीय नेत्यांना दणका – the spinning mill industry in the state is in crisis

हायलाइट्स:राज्यातील मोजक्या सूतगिरण्या वगळता इतर सर्वच तोट्यात गेल्याने आणि त्याला मंदीचा आणखी फटका बसत असल्याने हा उद्योग मोठ्या प्रमाणात संकटात आला आहे.पाच वर्षापूर्वी...

Rakesh Tikait: rakesh tikait : राकेश टिकैत वादात; म्हणाले, ‘लाल किल्ल्यावर पोलिसांनी गोळीबार का केला नाही?’ – someone goes red fort and hoists a...

नवी दिल्लीः दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चात झालेल्या हिंसाचारप्रकरणी ( tractor rally violence ) खटला दाखल झाल्यानंतर भारतीय किसान युनियनचे (टिकैट) प्रवक्ते राकेश टिकैत (...

Recent Comments