Home शहरं कोल्हापूर Kolhapur News : रस्त्यांवर थुंकल्याप्रकरणी मोटारसायकलस्वारावर गुन्हा - crime on a motorcyclist...

Kolhapur News : रस्त्यांवर थुंकल्याप्रकरणी मोटारसायकलस्वारावर गुन्हा – crime on a motorcyclist for spitting on the road


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रस्त्यांवर मावा खाऊन थुंकल्याप्रकरणी मोटारसायकलस्वारावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. विक्रम विद्याधर नांदगावकर (वय ३९, रा. सानेगुरुजी वसाहत, मूळ रा. रत्नागिरी) असे त्या संशयिताचे नाव आहे. बसंत बहार रोडवर हा प्रकार घडला. सामाजिक कार्यकर्त्या दीपा शिपूरकर यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टची दखल घेऊन पोलिसांनी कारवाई केली.

याबाबत शहर नियंत्रण शाखेचे निरीक्षक वसंत बाबर यांनी माहिती दिली. बसंत बहार रोडवर शनिवारी (ता.२) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास विक्रम नांदगावकर हा मोटारसायकलवरून जात होता. त्याने तोंडाला मास्क लावलेला नव्हता. मोटारसायकल चालवत असताना तो मावा खाऊन रस्त्यावर थुंकला. त्यावेळी याच मार्गावरून मोपेडवरून जात असलेल्या शिपूरकर यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी मोटारसायकलस्वाराला थांबवून थुंकल्याबाबत जाब विचारला. पण त्याने हुज्जत घालत’तुम्ही मला कोण विचारणार, मी कुठेही थुंकेन, तुमच्या अंगावर थुंकी पडली का?’ अशी उत्तरे दिली. शिपूरकर यांनी या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर टाकून झालेल्या घटनेबद्दल पोस्ट लिहिली. ही पोस्ट पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर सुत्रे हलली व संबधिताचा मोटारसायकल क्रमांकानुसार विक्रम नांदगावकरचा शोध घेतला. सुरुवातीला त्याचा पत्ता नागाळा पार्क येथे होता. नागाळा पार्क येथील घर सोडून तो साने गुरुजी वसाहत परिसरात रहायला गेला अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सानेगुरुजी येथील घराचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात सुरक्षिततेची काळजी न घेता मास्क न लावता मावा खाऊन रस्त्यावर थुंकल्याप्रकरणी कलम १८८,२६९,२७० अंतर्गत गुन्हा दाखल केला.

शिपुरकर झाल्या फिर्यादी

संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी दीपक शिपूरकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांना शाहूपुरी पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. तुम्ही टाकलेल्या पोस्टवरून संशयिताला ताब्यात घेतले आहे. तुम्ही तक्रार देणार आहात का? अशी विचारणा केल्यावर शिपुरकर यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दिली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

shaheen afridi: ‘या’ गोलंदाजाने भारताच्या जसप्रीत बुमराहचा विक्रम मागे टाकला – pakistan shaheen afridi became quickest 100 wickets in t20

नवी दिल्ली: भारताचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह(jasprit bumrah)चा टी-२० मधील विक्रम पाकिस्तानच्या एका गोलंदाजाने मागे टाकलाय. २०१८ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शाहीन...

Recent Comments