Home शहरं कोल्हापूर Kolhapur News : लुटमार करणाऱ्या टोळीला दोन दिवसांची कोठडी - two days...

Kolhapur News : लुटमार करणाऱ्या टोळीला दोन दिवसांची कोठडी – two days in jail for looting gang


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पोलिस असल्याचा बहाणा करून नाकाबंदी करत वाहनांची तपासणी करण्यासाठी नेमणूक केल्याचा बहाणा करून वाहनधारकांना अडवून लूटमार करणाऱ्या हुपरी परिसरातील तिघा जणांच्या टोळीच्या विरोधात योगेश एकनाथ आळवेकर (वय २५ रा. कुर्डू, ता. करवीर) यांनी करवीर पोलिसांत रविवारी फिर्याद दाखल केली. दरम्यान टोळीचा म्होरक्या शीतल विजय कांबळे ( रा. ३६ रा. शाहूनगर हुपरी), अण्णा आनंद शिंदे ( वय ३२ रा. रेंदाळ ता. हातकणंगले) आणि विकास सुरेश शिंदे ( ३५ रा. तळंदगे फाटा, इंगळी वसाहत हुपरी) या तिघांना कोर्टासमोर रविवारी हजर केले असता मंगळवारी (ता. २६) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

कोल्हापूर ते गारगोटी रोडवरील इस्पुर्ली (ता. करवीर) येथे योगेश एकनाथ आळवेकर (वय २५ रा. कुर्डू, ता. करवीर) यांची या तिघांनी लूटमार केली होती. लालपांढऱ्या रंगाच्या मोटारसायकल ( क्रमांक एम. एच. ०९, इ जे. ५९९६) हे तिघे जण आले होते. आळवेकर हे त्याचे मित्र राजाराम चौगुले, ट्रॅक्टरचालक संजय गुरव, युवराज चौगले, दादासाहेब पाटील (सर्व रा. इस्पुर्ली) हे सर्व जण ट्रॅक्टर ट्रॉली भरून शेणखत टाकण्यासाठी निघाले होते. त्यावेळी इस्पुर्ली येथील एका पेट्रोल पंपाजवळ या तिघांनी पोलिस असल्याचा बहाणा करून लॉकडाउनच्या काळात का फिरता, असा जाब विचारत या सर्वांना काठीने मारहाण केली. त्यांच्या पाकिटातून दोन हजार रुपये लंपास केले होते. करवीर पोलिसांनी या तिघांजणांच्या टोळीला शनिवारी पहाटे हळदी येथे सापळा रचून पकडले. त्या वेळी आळवेकर यांनी या तिघांनी लूटमार केल्याचे पोलिसांना सांगितले.

दरम्यान या टोळीतील आणखी काही साथीदार असल्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू केली आहे. टोळीने दहा ते बारा जणांची लूटमार केली आहे. त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

bmc health officers: रात्रभर जागले पालिकेचे अधिकारी – bmc officers was facing stress due to not receiving the cowin app’s message regarding covid-19 vaccination...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकोवीन अॅपवर नोंदणी झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणासंदर्भात मेसेज पाठवण्यात येणार होते. मात्र शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत अॅप आणि मेसेज न...

Sanjay Raut taunts Congress: हे वागणं ‘सेक्युलर’ नव्हे; संजय राऊतांचा काँग्रेसवर निशाणा – shiv sena mp sanjay raut slams congress for opposing renaming of...

मुंबई: औरंगाबादच्या नामांतरास विरोध करणाऱ्या काँग्रेसवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. 'औरंगजेब हा धर्मांध आक्रमक होता. तो ‘सेक्युलर’ अजिबात...

Recent Comments