Home शहरं कोल्हापूर Kolhapur News : ‘सीपीआर’च्या डीनची नियुक्ती वादात - the appointment of the...

Kolhapur News : ‘सीपीआर’च्या डीनची नियुक्ती वादात – the appointment of the dean of cpr is in dispute


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करोना उपचारात सातत्य आणि अधिक सुसूत्रता निर्माण व्हावी यासाठी राज्यातील कोल्हापूर, जळगाव, धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांच्या बदल्या करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निर्णयानुसार राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. जयप्रकाश रामानंद यांची शुक्रवारी झालेली नियुक्ती एका दिवसात रद्द करण्यात आली. एका राजकीय गटाने विरोध केल्याने डॉ. रामानंद यांची बदली थांबवण्यात आल्याची चर्चा दिवसभर सुरू होती.

करोना संक्रमणाशी लढा सुरू असताना राज्य सरकारने कोल्हापूर, जळगाव, धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठातांच्या बदलीचा निर्णय शुक्रवारी घेतला. विद्यमान अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांची जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी बदली करण्यात आली. तर मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांची धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली. तिघांनाही तत्काळ पदभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले.

डॉ. रामानंद शनिवारी पदाची सूत्रे स्वीकारणार होते. मात्र त्यांच्या नियुक्तीस राजकीय पक्षांकडून विरोध झाला. सीपीआरच्या अधिष्ठाता डॉ. गजभिये यांना जळगावला नियुक्ती देण्यात आली. मात्र डॉ. रामानंद हे शनिवारी कोल्हापूरकडे येण्याच्या तयारीत असताना त्यांना अचानक थांबवण्यात आले. डॉ. रामानंद यांच्या पूर्वीच्या येथील डीनपदाच्या कार्यकाळाबाबत काही आक्षेप असल्याने आणि काही घटक त्यांच्याविरोधात जाण्याची शक्यता असल्याने बदलीला स्थगिती देण्यात आली असल्याची चर्चा आहे. डॉ. रामानंद यांनी सीपीआरमध्ये यापूर्वी चांगले काम केले असल्याने त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांची पसंती आहे.

नव्या अधिष्ठातांविषयी उत्सुकता

सध्या सीपीआरला विशेष करोना रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे. जिल्ह्यात रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सीपीआरला पूर्णवेळ अधिष्ठाता कार्यरत असणे गरजेचे आहे. डॉ. गजभिये यांच्या जळगाव येथील अधिष्ठातापदी झालेल्या बदलीला आडकाठी आलेली नाही. त्यामुळे अधिष्ठातापदावर कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Rajesh Tope: आरटीपीसीआरच्या तपासण्या वाढवा; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आदेश – rtpcr testing should be increased to prevent coronavirus says health minister rajesh tope

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबादकरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आरटीपीसीआर चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढवाव्यात. यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांनी लक्ष घालावे, असे आदेश...

खुनाचा प्रयत्नप्रकरणी पतीला शिक्षा

म. टा. प्रतिनिधी, चारचाकी घेण्यासाठी माहेरहून तीन लाख रुपये आणत नाही म्हणून विवाहितेचा छळ करून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पती, सासू,...

Maharashtra Gram Panchayat Nivadnuk Nikal 2021: हर्षवर्धन जाधवांच्या मुलाचे आईविरोधात पॅनल; कोणी मारली बाजी? – aditya harshwardhan jadhav win more seat as comparatively to...

औरंगाबाद: कन्नड तालुक्यातील पिशोर ग्रामपंचायतीच्या निवडणूका माजी आमदार हर्षवधन जाधव यांच्या कौटुंबीक वादामुळे चर्चेत आल्या होती. या निवडणूकीसाठी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा...

Recent Comments