Home शहरं कोल्हापूर Kolhapur News : सुरक्षित वावरचा फज्जा - safe work

Kolhapur News : सुरक्षित वावरचा फज्जा – safe work


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर लॉकडाउनचे नियम शिथिल केले असले तरी शहरात सुरक्षित वावर करण्याच्या नियमांचा पूर्णपणे फज्जा उडाला आहे. शनिवारी शहरातील सर्व बाजारपेठा, दुकाने, केएमटी बसस्टॉप, रिक्षा वाहतुकीसह सर्वच गर्दीच्या ठिकाणी सुरक्षित वावरचा कोणताही नियम नागरिक पाळत नसल्याचे चित्र होते. महानगरपालिका आणि शहर पोलिस उपअधीक्षक कार्यालयाच्या पथकातर्फे सुरक्षित वावर न ठेवणाऱ्यावर कारवाई सुरू आहे. मात्र शुक्रवारपासून लॉकडाऊनचे नियम शिथील करुन प्रवासी वाहतूक सेवेतील रिक्षा, एसटी सेवा सुरू झाल्या. सर्व प्रकारची दुकाने, व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू झाले. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे उल्लंघन करुनच नागरिक रस्त्यावर बिनधास्तपणे वावरत होते. प्रत्येक चौकात पोलिस बंदोबस्त असून पोलिसांच्या समोरच सुरक्षित वावरासंबंधीच्या नियमांचा फज्जा उडाल्याचे चित्र शनिवारी शहरात होते. शिवाजी चौकात पोलिसांची छावणी आहे. मात्र या ठिकाणी मोठी गर्दी होती. प्रवाशांची केएमटीसाठी गर्दी केली. तेथे सुरक्षित वावरचा नियम पाळला गेला नाही. रिक्षा स्टॉवरही चालक एकत्रितपणे चर्चा करत बसले होते. काही दुकानांसमोर सुरक्षित वावरसाठी दोरी बांधली आहे. मात्र ग्राहकांसाठी आखून दिलेल्या चौकानात एकही ग्राहक उभा नव्हता. काहींनी मास्कही लावलेले नव्हते. मध्यवर्ती बसस्थानक आणि परिसरातील दुकानात नागरिकांची गर्दी होती. या ठिकाणीही नियम पाळले जात नव्हते. सर्व संस्था, कार्यालये सुरु झाली असली तरी त्या ठिकाणी कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी कोणत्याही प्रकारची नियमावली नव्हती. सुरक्षित वावर ठेवून कार्यालयीन कामकाजही अनेक ठिकाणी सुरु नव्हते. लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ, ऋणमुक्तेश्वर, ताराबाई रोडवरील भाजी मंडईतही सुरक्षित वावरचा फज्जा उडाला. मिरजकर तिकटी परिसरात काही कार्यकर्ते खुर्ची टाकून करोना विषयावर चर्चा करत बसले होते. राजारामपुरी, शाहूपुरी या परिसरास सायंकाळी मोठ्या संख्येने नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले. मात्र त्यांनीही नियम धाब्यावरच बसविले. खुली मैदाने, बागा, रंकाळा परिसरातही नागरिकांची गर्दी होती. ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने फिरण्यासाठी बाहेर पडले. मैदानावरही सुरक्षित वावरचे पालन केले जात नव्हते.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Coronavirus vaccination: PM मोदींच्या इशाऱ्यानंतर मंत्र्याचा यू-टर्न, नाही घेतली करोनावरील लस – coronavirus vaccination telangana health minister etela rajender

हैदराबाद: सर्व प्रथम करोनावरील लस ( coronavirus vaccination ) आपण घेणार, अशी घोषणा तेलंगणचे आरोग्य मंत्री एटाला राजेंद्र यांनी केली होती. पण पंतप्रधान...

Rahul Gandhi: राजस्थानमधील काँग्रेस अधिवेशनात राहुल गांधी पुन्हा होणार अध्यक्ष? – congress conclave may be held in rajasthan to reinstall rahul gandhi as congress...

नवी दिल्लीः नेतृत्वाच्या संकटाचा सामना करत असलेल्या काँग्रेस पक्षाची सूत्रे पुन्हा एकदा राहुल गांधी ( rahul gandhi ) यांच्या हाती जातील. राजस्थानमध्ये फेब्रुवारी...

Recent Comments