Home शहरं कोल्हापूर kolhapur temple theft: खुनातील गुन्हेगार पॅरोलवर सुटला अन् मंदिरातील दानपेट्यांवर मारला डल्ला...

kolhapur temple theft: खुनातील गुन्हेगार पॅरोलवर सुटला अन् मंदिरातील दानपेट्यांवर मारला डल्ला – temple theft man held for loot at temple in kolhapur


उद्धव गोडसे, कोल्हापूर:

कारागृहात करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून पॅरोलवर बाहेर सोडलेले कैदी आता पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. कळंबा कारागृहातील कैद्याने पॅरोलवर बाहेर येताच कोल्हापूर शहरातील मंदिरांचे दरवाजे उचकटून दानपेट्या लंपास केल्या. पाच मंदिरांमधील दानपेट्या पळवल्यानंतर अखेर तो लक्ष्मीपुरी पोलिसांच्या हाती लागला. किरण भगवान मोहिते (वय ३४, रा. मार्केट यार्ड) असे चोरट्याचे नाव आहे.

लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण मोहिते हा सराईत चोरटा आहे. यापूर्वीही त्याने शहरातील मंदिरांमधील दानपेट्या पळवल्या आहेत. पाच वर्षांपूर्वी त्याने शहरातील जुना राजवाडा आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील मंदिरांचे दरवाजे उचकटून चोऱ्या केल्या होत्या. राजर्षी शाहू मार्केट यार्ड परिसरात एका फळ विक्रेत्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी त्याला शिक्षा झाली होती. करोनाचा संसर्ग सुरू झाल्याने कळंबा कारागृहातून त्याला पॅरोल मिळाला. महिनाभरापूर्वीच तो पॅरोलवर बाहेर आला होता.

वर्धा हादरले! १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

ते पत्ते खेळत होते, कडाक्याचं भांडण झालं अन् क्षणार्धात…

कारागृहातून सुटका होताच त्याने पुन्हा मंदिरांना लक्ष्य केले. लॉकडाउनमुळे घरांपेक्षा मंदिरांमध्ये चोरी करणे अधिक सुरक्षित वाटल्याने त्याने मंदिरांमधील दानपेट्यांवर डल्ला मारला. रात्रीच्या अंधारात कटावणीने मंदिरांचे दरवाजे उचकटून तो मंदिरात प्रवेश करीत होता. पैसे काढून घेऊन तो दानपेटी भंगारात देत होता. यापूर्वी त्याने मंदिरातील मूर्तींवरील दागिनेही लंपास केले होते. महानगर पालिकेसमोरील शनी मंदिरात चोरी करताना तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. यावरून लक्ष्मीपुरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्याने मंदिरांमध्ये चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून आणखी काही चोरीच्या घटनांची उकल होण्याची शक्यता पोलीस उपनिरीक्षक सुनीता शेळके यांनी व्यक्त केली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jameel shaikh murder: Jameel Shaikh Murder: मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येला गंभीर वळण; ठाण्यातील ‘तो’ नगरसेवक कोण? – jameel shaikh death complaint against thane corporator

महेश गायकवाड । ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांचे मारेकरी २४ तासानंतरही सापडलेले नसून मारेकऱ्यांना अटक करण्याचे पोलिसांचे युद्धपातळीवर...

cricket news News : ‘भारताचा कसोटी मालिकेत ४-० असा पराभव होणार’ – india tour of australia 2020 india will lose 4-0 in test series...

नवी दिल्ली: india tour of australia 2020सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघ वनडे आणि टी-२० मालिकेनंतर कसोटी मालिका खेळणार आहे. चार सामन्यांच्या कसोटी...

Recent Comments