Home देश Kollam woman: दुसऱ्यांदा सर्पदंश झाल्याने महिलेचा मृत्यू, हत्येचा गुन्हा दाखल - kollam...

Kollam woman: दुसऱ्यांदा सर्पदंश झाल्याने महिलेचा मृत्यू, हत्येचा गुन्हा दाखल – kollam woman’s death after second snake bite, three arrested in connection with the murder


तिरुअनंतपूरमः केरळमध्ये एका तरुण महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाला. दोन महिन्याच्या कालावधी तिला दुसऱ्यांदा सर्पदंश झाला. तिला साप येऊन चावला नाही. सर्पदंश घडवून आणून तिची हत्या केली गेली, असा आरोप त्या महिलेच्या वडिलांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केलीय. या प्रकरणी काही संशयास्पद गोष्टी समोर आल्या आहेत, अशी माहिती तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने दिली.

महिलेच्या हत्येप्रकरणी तिचा पती, एक स्थानिक सर्पमित्र आणि त्याचा सहकारी अशा तिघांना अटक करण्यात आली आहे. कोल्लम जिल्ह्यातील अंचल येथे राहणाऱ्या एस. उथ्रा (वय २५) या महिलेला दुसऱ्यांना सर्पदंश झाल्याने तिचा मृत्यू झाला. पहिल्या सर्पदंशानंतर तिच्यावर उपचार सुरू होते. या उपचारदरम्यान तिला दुसऱ्यांदा साप चावला आणि तिचा त्यात मृत्यू झाला. यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिच्या पतीसह सासरच्या मंडळींविरोधात तिची हत्या केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

ही घटना ७ मे रोजी घडली. पण महिलेच्या पतीने आपल्याच भावाविरोधात पोलिसात तक्रार केली. भावाने मालमत्तेच्या कारणातून ही हत्या घडवून आणल्याचा आरोप त्याने केला. महिलेला पहिल्यांदा घोणसने चावा घेतला होता. तर दुसऱ्यांदा झालेला सर्पदंश हा कोब्राचा होता. महिलेला घोषण चावा घेतला त्यावेळी ती सासरी होती. मार्चमध्ये हा प्रकार घडला. याननंतर ती माहेरी आल्यावर सात मे रोजी तिला कोब्राने चावा घेतला होता.

महिलेचा पती सूरज हा एका खासगी बँकेत कामाला आहे. सुरेश हा त्याचा मित्र. तो साप पकडतो. सूरजने सुरेशला महिलेच्या हत्येसाठी १० हजार रुपये दिले होते. यानंतर सुरेशने विषारी साप महिलेच्या बेडरूम सोडला. आम्ही या प्रकरणी तिघांना अटक केलीय. या प्रकरणी तपास सुरू आहे. यामुळे अधिक माहिती देता येणार नाही, असं पोलिसांनी स्पष्ट केलंय. पत्नीच्या हत्येसाठी सूरजने पाच महिन्यांपूर्वी कट रचला होता. तिला पहिल्यांदा साप चावला तोही याच कटाचा भाग होता, असं पोलीस म्हणाले.

यूपी सरकारने करोना वॉर्डातील मोबाइल बंदी उठवली

हरयाणा: अमेरिकेहून परतलेल्या ७३ पैकी २१ जणांना करोना

उथ्रा बेडरूममध्ये पतीसोबत झोपली होती. पण सकाळी ती उठलीच नाही. आम्ही लगेचच तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. यानंतर तिची खोली तपासल्यावर तिथे मोठा कोब्रा आढळून आला. यानंतर महिलेचा पती सूरजने त्या सापाला मारलं, असं महिलेच्या कुटुंबीयांनी तक्रारीत म्हटलंय. तर आपल्याला साप दिसलाच नाही आणि आपण कुणाला बघितलं नाही, असा दावा महिलेचा आरोपी पती सूरजने केलाय.

आपल्या मुलीचा हुंड्यावरून सासरी सतत छळ केला जात होता. शिवाय लग्नात तिला दिलेले दागिनेही तिच्या कपाटात सापडले नाहीत. मुलींचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. तिला एक वर्षाचा मुलगा आहे, अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिलीय. मुली आणि जावई झोपले ती एसी रूम आहे. यामुळे रुमध्ये आलेला साप जावई सूजला दिसला नाही हे अशक्य आहे. पहिल्यांदा साप चावल्यानंतर उपचारासाठी तिला आम्ही माहेरी आणलं होतं. काही जावई सूरज हा काही स्थानिक सर्पमित्रांच्या संपर्कात असल्याचा आरोपही तिच्या कुटुंबीयांनी केलाय.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

coronavirus in aurangabad: २४ बाधितांची भर; ४८ जणांची सुटी – aurangabad corona update : aurangabad reported 24 new corona cases in yesterday

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णसंख्येचा आकडा दिवसेंदिवस कमी होत आहे. रविवारी जिल्ह्यात २४ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर, ४८ जण बरे होऊन...

President Ramnath Kovind: president speech on republic day : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे देशाला संबोधन… – president ramnath kovind speech on republic day live...

नवी दिल्लीः देश उद्या आपला ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. करोना संकटाच्या स्थितीत आणि चीन, पाक सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती देशाला...

Recent Comments