Home शहरं मुंबई Koregaon Bhima: कोरेगाव भीमा : राव, सेन यांचे जामीन अर्ज नामंजूर -...

Koregaon Bhima: कोरेगाव भीमा : राव, सेन यांचे जामीन अर्ज नामंजूर – rao, sen’s bail application rejected


‌म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

कोरेगाव भीमा येथे झालेला हिंसाचार व माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले वरवरा राव आणि प्रा. शोमा सेन यांनी ‘करोना’च्या भीतीपोटी तात्पुरता जामीन मिळवण्यासाठी केलेले अर्ज विशेष एनआयए न्यायालयाने शुक्रवारी पुन्हा एकदा फेटाळले. यापूर्वी याच कारणाखाली केलेले अर्ज न्यायालयाने ३१ मार्च रोजी फेटाळले होते.

‘आम्हाला विविध प्रकारचे आजार असून, वयही जास्त आहे. करोनाचा संसर्ग झाल्यास आम्हाला अधिक धोका आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर कैद्यांची तात्पुरती सुटका करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचेही निर्देश आहेत. त्यामुळे उच्चाधिकार समितीने घालून दिलेल्या निकषांप्रमाणे करोनाचे संकट टळेपर्यंत आम्हाला अंतरिम जामीन देण्यात यावा’, अशी विनंती दोघांनीही अर्जात केली होती. राव हे तळोजा तुरुंगात बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना उपचारांसाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात हलवावेही लागले होते. मात्र, तुरुंगात सर्वच कैद्यांची आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात येत असल्याचे म्हणत एनआयएने अर्जांना विरोध दर्शवला. त्यानंतर न्यायालयाने दोघांचे अर्ज फेटाळून लावले.

या प्रकरणाचा पूर्वी तपास केलेल्या पुणे पोलिसांनी नागपूर विद्यापीठातील इंग्रजी विभागाच्या प्रमुख प्रा. शोमा सेन यांना जून-२०१८मध्ये अटक केली, तर हैदराबाद येथील वरवरा राव यांना नोव्हेंबर-२०१८मध्ये अटक केली. न्यायालयाकडून जामीन मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न यापूर्वी अनेकदा अयशस्वी ठरले आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Ramchandra Guha Criticize N. Srinivasan And Sourav Ganguli’s Role In Indian Cricket – अमित शहा यांच्याबरोबर कोण चालवंतय बीसीसीआय, रामचंद्र गुहा यांनी केला गंभीर...

मुंबई : राजकारण आणि क्रिकेट यांचा संबंध फार वर्षांपासून येत आला आहे. पण सध्याच्या घडीला भारताचे गृह मंत्री अमित शहा हे बीसीसीआय चालवत...

Katrina Kaif Covid-19 Test Before Shoot Watch Video – कतरिना कैफने शेअर केली तिची करोना टेस्ट, लवकर सुरू करणार शूटिंग

मुंबई- करोना व्हायरसचा वाढा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सुरुवातीच्या काळात जगभरात लॉकडाउन करण्यात आलं. सिनेसृष्टीतही यातून सुटली नाही. अनेक निर्बंधासह शूटिंगचं काम तातडीने बंद...

Recent Comments