Home मनोरंजन kori pati production corona videos: मुंबई ,पुणेकर नाही आपलेच गावकरी...! - kori...

kori pati production corona videos: मुंबई ,पुणेकर नाही आपलेच गावकरी…! – kori pati production videos of viral on corona , lockdown and videos


रामेश्वर जगदाळे

मुंबई: करोना व्हायरसनं सगळीकडे थैमान घातलेलं असतानाच लोकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी तरुणांकडून सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसतो आहे. ‘कोरी पाटी प्रोडक्शन’च्या टीमनं सोशल मीडियाचा आधार घेत, शहरातून ग्रामीण भागात आलेल्या लोकांशी वागतानाचं चित्र कसं असावं, या विषयावर सातारा पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानं जनजागृती करणाऱ्या काही व्हिडीओंची निर्मिती केली आहे. सध्या ग्रामीण आणि शहरी भागात या व्हिडीओंची चर्चा आहे.

‘गावाकडच्या गोष्टी’ या वेब सीरिजच्या माध्यमातून शहरी भागात राहणाऱ्या, मात्र गावाशी अजूनही नाळ जोडलेली असणाऱ्या लोकांचं ‘कोरी पाटी प्रोडक्श’नं आपल्या व्हिडीओमार्फत मनोरंजन आणि प्रबोधन केलं आहे. शहरात मोठ्या प्रमाणात बळावलेला हा आजार गावात पसरू नये म्हणून स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जात आहे. अशा वेळी कुणी राजकारण करू नये, नेमून दिलेल्या नियमांचं पालन करावं. रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून कोणत्या गोष्टींची काळजी घेतली जावी आणि शहराकडून येणाऱ्या लोकांबद्दलचा दृष्टिकोन कसा असावा अशा आशयाचे हे व्हिडीओ केले आहेत.

पाहा व्हिडीओ:

आर.माधवनचं कोल्हापूर कनेक्शन माहित्येका?

व्हिडीओचे दिग्दर्शक नितीन पवार सांगतात, की ‘शहरात गेलेला कर्मचारीवर्ग गावाकडे वाट धरतो आहे. मात्र गावातील स्थानिक लोकांकडून त्याला विरोध होतो. तर कुठे लोक याचं राजकारणसुद्धा करताना दिसतात. त्याबरोबरच गावागावात अनेक समज-गैरसमज आहेत. कधी कधी लोकांकडून नियमाचं उल्लंघन होतं. पोलीस प्रशासन गावागावात शिस्त ठेवून आहे. त्यांच्यावर अधिकचा ताण आहे. या गोष्टी लक्षात घेता जनजागृती करणं गरजेचं होतं व यात आम्हाला प्रशासनाची मोलाची साथ लाभली, म्हणून या व्हिडीओची निर्मिती केली.’

युट्यूबच्या माध्यमातून हे व्हिडीओ ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांच्या पसंतीस पडत आहेत. आमदार रोहित पवार यांनीही ट्विटरद्वारे व्हिडीओ शेअर करत, ग्रामीण भागात रोग पसरू नये ही ग्रामस्थांची आणि शहरी भागातून येणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. दिलेल्या नियमाचं पालन करत सहकार्य करा, असा संदेश दिला आहे.

आपल्या कलेनं लोकांचं मनोरंजन आणि प्रबोधनही व्हावं, ग्रामीण भागात नियम पाळले जावेत, लोकांना आजाराबद्दल जाणीव व्हावी असा प्रयत्न होता. त्यात आम्हाला प्रशासनाची साथ लाभली. काम करताना सुरक्षित अंतर पाळून आम्ही चित्रीकरण केलं. शहराकडून येणारी लोकंसुद्धा गावची आहेत. संकट आहे म्हणून ते आपल्या घरी येत आहेत. गावच्या लोकांनी थोडा दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे. याबद्दल जनजागृती व्हावी असा उद्देश होता.

– नितीन पवार (दिग्दर्शक)

‘हिंदुस्तानी भाऊ’चा धमाका; एकता कपूरविरोधात एफआयआर दाखलSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

America: आवश्यक दिलासा – green card eligibility categories and indian citizens

अमेरिकेत अनेक वर्षे राहून काम करणाऱ्या हजारो भारतीयांना, त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आणि अतिशय आवश्यक असणारा दिलासा अमेरिकी सिनेटने दिला आहे.  Source link

ranjitsinh disale: रणजितसिंह डिसले यांचे अभिनंदन – cm uddhav thackeray congratulates global teacher winner ranjitsinh disale

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई युनेस्को आणि लंडन येथील वार्की फाऊंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...

Recent Comments