Home आपलं जग करियर Kota Students : कोटा येथून विद्यार्थ्यांना आणण्याची प्रक्रिया सुरू - process to...

Kota Students : कोटा येथून विद्यार्थ्यांना आणण्याची प्रक्रिया सुरू – process to bring back students from kota started


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य सरकारच्या पुढाकारानंतर कोटा येथे ‘लॉकडाऊन’मध्ये अडकलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात येण्यासाठी परतीचा मार्ग धरला आहे. कोणी वाहनांची सोय करेल याची वाट पाहत बसण्यापेक्षा अनेक पालकांनी स्वतःची वाहने किंवा खाजगी वाहन तरी आपल्या पाल्यांना परत आणण्यासाठी प्रक्रिया सुरू केली.

कोटा (राजस्थान) येथे शिक्षणासाठी गेलेले राज्यातील हजारो विद्यार्थी ‘लॉकडाऊन’मुळे तेथे महिनाभरापासून विविध वसतिगृहे, भाड्याच्या घरातच अडकून पडले. यातील काही विद्यार्थी एकटे राहत आहेत. तेथे गैरसोय होत असल्याने विद्यार्थ्यांनी, पालकांनी राज्य सरकारला परत आणण्यासाठी साकडे घातले होते.

उत्तर प्रदेश सरकारने ३०० बसमधून कोटा येथून त्यांच्या राज्यातील विद्यार्थ्यांना नेले. त्याचप्रमाणे आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांना देखील परत आणण्याची शासनाने व्यवस्था करावी, अशी मागणी विद्यार्थी पालक लोकप्रतिनिधी यांच्याकडून होत होती. राज्य सरकारने याप्रकरणी राजस्थान सरकारशी चर्चा केली. त्यांनी याबाबत पुढाकार घेतल्याने परतीचा मार्ग मोकळा झाला. राज्य सरकार त्यांना आणण्याची सोय करणार याची प्रतीक्षा न करता पालक आपल्या स्वतःच्या वाहनातून किंवा खाजगी वाहनातून आपल्या पाल्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेकांनी त्यासाठी तेथूनच खाजगी गाड्या बुकिंग केले आहे. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या गाड्या येतील, असे पालकांनी ‘मटा’ला सांगितले.

मराठवाड्यातील दोन हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी

राष्ट्रीय पातळीवरील अभियांत्रिकी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी कोटा येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. कोटा येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यातील दोन हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी ‘लॉकडाऊन’मध्ये अडकल्याची शक्यता आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Fake SMS वरून ट्रायचा BSNL, Airtel, Jio, Vi सह कंपन्यांवर कोट्यवधींचा दंड

नवी दिल्लीः टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने ग्राहकांना फेक एसएमएस पाठवल्याप्रकरणी भारतातील ८ टेलिकॉम कंपन्यांवर संयुक्तपणे ३५ कोटींचा दंड ठोठावला आहे....

26/11 Mumbai Attack in Marathi: Mumbai 26/11 attack २६/११ हल्ला: ‘या’ देशात उभारले जाणार स्मारक – Mumbai Terror Attack Israelis Planning Memorial For Victims...

तेल अवीव: मुंबईत २००८ मध्ये झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यात भारतासह इतर देशांतील नागरिकांचा मृत्यू झाला होता. दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ इस्रायलमध्ये...

Recent Comments