भारताविरोधात ओली यांचे आरोप अत्यंत चुकीचे आहेत. भारत नव्हे, तर मी स्वतः तुमचा राजीनामा मागत आहे. या बेजबाबदार वक्तव्यासाठी अगोदर पुरावे सादर करा, अशी मागणी पुष्पा कमल यांनी केली. स्थायी समिती सदस्यांच्या मते, खनल, माधव नेपाळ आणि गौतम यांनी ओलींवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आणि मित्र देशाविरोधात चुकीचं आणि बेजबाबदार वक्तव्य केल्याचा आरोप केला.
भारताचा माझं सरकार पाडण्याचा डाव; दिल्लीत बैठका : केपी शर्मा ओली
ओली यांनी स्थायी समिती सदस्यांना उत्तरही दिलं आहे. बंद दाराआड झालेल्या बैठकीतील माहिती भारतीय माध्यमांपर्यंत कशी जाते, असा सवाल त्यांनी विचारला. भारत काही नेपाळमधील नेत्यांच्या मदतीने सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय माध्यमातील याविषयीचे वृत्त आणि काठमांडूतील भारतीय दुतावासातील चर्चा यावरुन हे स्पष्ट होतं, असा आरोप ओली यांनी केला. दुसरीकडे नेपाळमधील चीनचे राजदूत होऊ यांकी यांनी भारतीय लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्यावर टीका केली. नेपाळ दुसऱ्या एका देशाच्या इशाऱ्यावर नाचत असल्याचं नरवणे म्हणाले होते.
भारतातील करोना चीनपेक्षा अधिक जीवघेणाः नेपाळ
ओली यांच्या वक्तव्यानंतर आता स्वपक्षिय नेतेच आक्रमक झाले आहेत. गौतम हे बैठकीत सर्वात आक्रमक झाल्याची माहिती आहे. पक्ष अध्यक्ष आणि पंतप्रधान या दोन्ही पदांचा राजीनामा ओली यांनी द्यावा, असं ते म्हणाले. पक्षाबाहेरुनही ओलींवर टीका होत आहे. भारताविरोधात केलेल्या आरोपांवर ओली यांनी तातडीने पुरावे सादर करावेत, अशी मागणी नेपाळचे माजी पंतप्रधान बाबुराम भट्टाराय यांनी केली. भारतीय दुतावास सरकार पाडण्याचं नियोजन करत आहे, तर मग तुम्ही राजदुताला काढून का टाकत नाही, असा सवालही त्यांनी केला.
नेपाळचा नवा नकाशा; भारताच्या भूभागावर केला दावा
नेपाळमधील एका पक्षाचे सहअध्यक्ष डॉ. प्रकाश चंद्र लोहानी यांनीही ओलींवर निशाणा साधला. ओलींना बाहेर काढण्यासाठी कुणाचीही गरज नाही. त्यांना स्वतःच बाहेर पडण्याची घाई झाली आहे, असं ते म्हणाले.