Home मनोरंजन kshitij patwardhan on liquor shop: व्यसनाला असलेली भिकार प्रतिष्ठा सगळ्यांना घेऊन बुडणार:क्षितिज...

kshitij patwardhan on liquor shop: व्यसनाला असलेली भिकार प्रतिष्ठा सगळ्यांना घेऊन बुडणार:क्षितिज पटवर्धन – queue for liquor: kshitij patwardhan facebook about liquor shop in lockdown


मुंबई: देशभरात लॉकडाउनचा तिसरा टप्पा आजपासून सुरू झाला आहे. आजपासून रेड, ऑरेन्ज आणि ग्रीन झोनमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. याबरोबरच आजपासून देशभरात दारूची दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्यांपासून दारूपासून दूर असलेल्या लोकांनी सूट मिळताच आज सकाळपासूनच दारूच्या दुकानांपुढे रांगा लावल्या. काही ठिकाणी तर सकाळी दुकाने उघडण्याच्या दोन तास आधीपासूनच लोकांनी रांगा लावायला सुरुवात केलेली दिसली.

दीड महिन्यापासून दारूपासून लांब राहिलेल्या तळीरामांनी आज सकाळी सकाळीच वाईन शॉपची दुकाने गाठली. वाईन खरेदीसाठी सर्वात आधी आपला नंबर लागावा म्हणून अनेकांनी थेट दुचाकीवरून वाईनशॉप गाठले. त्यामुळं ठिकठिकाणी वाईन शॉपबाहेर तुफान गर्दी झाल्याची पाहायला मिळाली. याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या सर्व गोष्टीवर मराठी सिनेसष्टीतला प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत टीका केली आहे.
दारूच्या दुकानांसमोर सकाळपासूनच रांगा, लोकांमध्ये दिसली अधीरता
क्षितिजनं दारुला असलेल्या प्रतिष्ठेला आणि ग्लॅमरवर भाष्य केलं आहे. दारु पिणं म्हणजे खूर मोठं काम केलं असं समज असलेल्यांना त्यानं सुनावलं आहे. ‘व्यसनाला असलेली भिकार प्रतिष्ठा आणि सो कॉल्ड कुलनेस सगळ्यांना घेऊन बुडणार एक दिवस. किलोमीटर भर रांगा लागल्यात दारूच्या दुकानाबाहेर!!’ अशा शब्दांत त्यानं देशातील सध्य परिस्थितिवर परखड मत व्यक्त केलं आहे.
तळीराम बाहेर पडले; वाईनशॉपसमोर तुफान गर्दी

दरम्यान, आज मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक भागात तळीरामांनी दारू विकत घेण्यासाठी दारुच्या दुकानाबाहेर मोठी गर्दी केली. अनेक ठिकाणी दारुच्या दुकानाबाहेर मंडप टाकण्यात आले होते. तर काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं म्हणून लोकांना उभं राहण्यासाठी दुकानाबाहेर ठरावीक अंतरावर गोल रिंगण करण्यात आलं होतं. या रिंगणात उभे राहिलेल्यांनाच दारूच्या बाटल्या दिल्या जात होत्या. अनेक ठिकाणी तर तळीरामांनी स्वत:च सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत दारूच्या बाटल्या विकत घेतल्या. काही ठिकाणी तर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

महाविकास आघाडी: ‘हा’ विषय बावनकुळेंना समजू शकणार नाही; गृहमंत्र्यांचा पलटवार – the power outage in mumbai is a technical matter, says anil deshmukh

हायलाइट्स:मुंबईतील 'पॉवर कट'वरून भाजप-महाविकास आघाडी आमनेसामनेमाजी ऊर्जामंत्री बावनकुळे यांची राज्य सरकारवर टीकागृहमंत्री अनिल देशमुख यांचा बावनकुळेंवर पलटवारनागपूरः मुंबईत १२ ऑक्टोबर रोजी वीज पुरवठा...

PM Modi: pm modi : PM मोदींच्या पश्चिम बंगालमध्ये होणार तुफानी प्रचारसभा, भाजपची रणनीती तयार – assembly election 2021 pm modi bjp campaign strategy...

नवी दिल्लीः निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच ४ राज्ये आणि १ केंद्रशासित प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांची ( assembly election 2021 ) घोषणा केली. त्यापुढच्या काही...

nicolas sarkozy corruption: Nicolas Sarkozy Corruption भ्रष्टाचार प्रकरणी फ्रान्सच्या माजी अध्यक्षांना तुरुंगवासाची शिक्षा – former french president nicolas sarkozy guilty of corruption given one...

पॅरिस: फ्रान्सचे माजी अध्य़क्ष निकोलस सरकोझी यांना पॅरिसमधील न्यायालयाने सोमवारी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोषी ठरवले. त्यांना एक वर्ष तुरुंगवास आणि निलंबित कारावासाची शिक्षा सुनावण्यात...

Recent Comments