Home शहरं मुंबई kshitij prasad: Kshitij Prasad: ड्रग्ज प्रकरण: क्षितिज प्रसादला २ महिन्यांनंतर मिळाला जामीन,...

kshitij prasad: Kshitij Prasad: ड्रग्ज प्रकरण: क्षितिज प्रसादला २ महिन्यांनंतर मिळाला जामीन, पण… – drug case special ndps court grants bail to executive producer kshitij prasad


मुंबई: ड्रग्ज प्रकरणी सप्टेंबर महिन्यापासून अटकेत असलेला करण जोहर यांच्या धर्मा प्रोडक्शनचा माजी कर्मचारी व कार्यकारी निर्माता क्षितिज रवी प्रसाद याला आज मुंबईतील विशेष एनडीपीएस कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, अन्य एका प्रकरणातही क्षितिजला आरोपी करून अटकेची कारवाई करण्यात आलेली असल्याने तूर्त त्याची सुटका होणार नाही. ( Special NDPS Court Grants Bail To Executive Producer Kshitij Prasad )

वाचा: चित्रपटाच्या नावाचा वाद; मधुर भांडारकर यांच्या आरोपांवर करणनं दिलं स्पष्टीकरण

क्षितिज प्रसाद याला ड्रग्ज प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी ) २६ सप्टेंबर रोजी अटक केली होती. त्याने जामिनासाठी केलेल्या अर्जावर आज विशेष एनडीपीएस कोर्टाने निर्णय देत त्याला ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच रकमेच्या एक किंवा दोन हमीदारांवर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. हमीदार सादर करण्यासाठी त्याला चार आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत आरोपी प्रसादला ५० हजार रुपयांच्या रोख जामिनावर सोडण्यात यावे. आरोपीने एनसीबीकडे आपला पासपोर्ट जमा करावा आणि न्यायालयाच्या परवानगीविना देश सोडू नये, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

वाचा: अमली पदार्थ प्रकरणात भारती आणि हर्ष यांना दिलासा; जामीन मंजूर

‘मुंबईबाहेरही जायचे असल्यास आरोपीने तपास अधिकाऱ्याला संपर्काचे तपशील सादर करावे. पुढील ६ महिन्यांसाठी प्रत्येक महिन्यातील पहिल्या सोमवारी सकाळी १० ते ११ या वेळेत एनसीबी कार्यालयात हजेरी लावावी. न्यायालयातील सुनावणीला हजेरी लावावी. साक्षीपुराव्यांशी छेडछाड करू नये’, असेही न्यायालयाचा आदेशात नमूद केले आहे. दिवाळीपूर्वी क्षितिज प्रसादच्या जामीन अर्जावर विशेष एनडीपीएस न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीत क्षितिजसाठी अॅड. सतीश मानेशिंदे यांनी युक्तिवाद मांडला होता. त्यानंतर न्यायालयाने आज आपला निर्णय दिला.

वाचा: रणवीरने उडवली होती सुशांतची खिल्ली? ‘ती’ जाहिरातीत बॅन करण्याची चाहत्यांची मागणी

जामिनासाठी आणखी एक अर्ज

क्षितिज प्रसाद याला आज न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी तो सध्या तुरुंगाबाहेर येऊ शकणार नाही. त्याला अन्य एका प्रकरणातही आरोपी करून अटकेची कारवाई करण्यात आलेली आहे. त्या प्रकरणातही क्षितिजच्या वतीने जामिनासाठी अर्ज करण्यात आला असून त्याच्या जामीन अर्जावर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे, अशी माहिती सतीश मानेशिंदे यांनी दिली.

वाचा: तिनं काय आयुष्यभर विधवा म्हणून जगायचं का? अंकिताच्या चाहत्यांचं उत्तरSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

leopard couple died in nashik: बिबट्याच्या जोडीचा गोदापात्रात बुडून अंत – leopard couple died due drowning in godavari river

म. टा. वृत्तसेवा, निफाडभक्ष्याच्या शोधात रात्रीची भटकंती करताना गोदावरी नदीपात्रातील गाळामध्ये अडकून पडले त्यातच नाकातोंडात पाणी गेल्याने बिबट्या व व त्याची मादी या...

Ajinkya Rahane: IND vs AUS : भारताच्या विजयानंतर अजिंक्य रहाणे नेमकं काय म्हणाला, पाहा… – ind vs aus : indian captain ajinkya rahane what...

ब्रिस्बेन, IND vs AUS : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजयाची नोंद केली. या विजयानंतर अजिंक्यवर जोरदार कौतुक होत आहे. पण...

दिल्लीतील 'या' अधिकाऱ्याच्या नावानं पुणे मेट्रोच्या संचालकांना फोन, म्हणाला…

पुणे: केंद्रीय सचिवांच्या नावाने महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)चे प्रमुख व मेट्रोचे कार्यकारी संचालक यांना फोन करून मेट्रोचे कंत्राट मिळवून देण्यास सांगितल्याचा...

Recent Comments