Home देश Ladakh face off: भारत-चीन तणाव; संरक्षणमंत्र्यांसह लष्कर प्रमुख शुक्रवारी लडाखला जाणार -...

Ladakh face off: भारत-चीन तणाव; संरक्षणमंत्र्यांसह लष्कर प्रमुख शुक्रवारी लडाखला जाणार – india china standoff defence minister rajnath singh, army chief to visit leh on friday


नवी दिल्लीः संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे शुक्रवारी लडाखमधील लेहला भेट देणार आहेत. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर (LAC) चिनी सैन्याच्या आक्रमकतेमुळे सीमेवरील परिस्थितीचा आढावा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह घेणार आहेत. चिनी सैन्याने LAC वर सैनिकांच्या आणखी दोन डिव्हीजन तैनात केल्या आहेत. गुप्तचर यंत्रणांनी ही माहिती दिलीय. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री लडाखला भेट देणार आहेत.

एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी भारत-चीनमध्ये लष्करी पातळीवर चर्चा सुरू असताना चिनी सैन्याने प्रत्यक्ष ताबा रेषेवर (LAC) सैनिकांची संख्या वाढवल्याने सीमेवरील तणावात भर पडली आहे. भारत-चीनच्या लष्करी स्तरावरील बैठकीत सीमेवरील सैन्य मागे घेण्यावर चिनी मेजर जनरल लीउ लीन यांनी तयारी दर्शवली होती.

चीनने पूर्व लडाखमध्ये २४ हजार सैनिक तैनात केले आहेत. याशिवाय चीनने सीमेवर मोठ्या प्रमाणावर अवजड शस्त्रास्त्र आणि दारूगोळाही आणला आहे. तोफा, रणगाड्यांसह चीनने एलएसीवर लढाऊ विमानंही तैनातक केली आहेत.

चीनकडून तिबेटमध्ये नेहमी सैनिकांच्या दोन डिव्हीजन तैनात केल्या जातात. पण यावेळी चीनने सैनिकांच्या आणखी दोन डिव्हीजन तैनात केल्या आहेत. यामुळे चीनने सैन्य मागे हटवण्याच्या निर्णयावर घुमजाव केल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे.

भारत-चीनमध्ये चर्चेची तिसरी फेरी, मात्र सीमेवर चिनी सैनिकांची संख्या वाढतीच

स्वतःच्या देशाविरोधात बाजू मांडणार नाही; मुकुल रोहतगींचा टिकटॉकला नकार

एलएसीवर चीनच्या सुरू असलेल्या हालचालींवर भारत बारकाईने लक्ष ठेवून आहे. चिनी ज्या प्रमाणा सैन्य वाढत आहेत तेवढ्याच संख्येत भारताकडून सीमेवर जवानांची तैनाती करण्यात येत आहे.

चीन सैन्य हटवण्यास गंभीर नाही

पँगाँग सरोवराच्या भागातून सैनिक मागे हटवण्यास चीनने तयारी दर्शवली होती. पण प्रत्यक्षात चीनने सैनिक हटवले नाहीत. प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ फिंगर ८ वर भारताने दावा केला आहे. याशिवाय चिनी सैनिक फिंगर ४ आणि ५ मध्ये तंबू ठोकून आहेत. तसंच डेपसांग आणि डेमचोकमध्येही चिनी सैनिकांची उपस्थिती आहे. यावरून भारताने आक्षेप नोंदवला आहे.

चिनी सैन्याकडून सैनिकांची वाढती तैनाती पाहता सीमेवरून सैनिक हटवण्यास चीन गंभीर नसल्याचं स्पष्ट होतंय. एवढचं नाही तर सीमेवर आणखी सैनिकांची आणि शस्त्रास्रांची तैनाती चीनकडून करण्यात येत आहे.

लडाखमध्ये मेपूर्वी प्रत्यक्ष ताबा रेषेवर जी स्थिती होती तशी कायम ठेवावी अशी भारताची चीनकडे मागणी आहे. पण त्यावर अजून चीनकडून कुठलीही सकारात्मक प्रतिक्रिया आलेली नाही. तसंच सीमेवरून सैनिक हटवण्याबाबत कुठलेही संकेत मिळत नाही.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

farmers protest: tractor rally : दिल्लीत हिंसक आंदोलन; केंद्राकडून गंभीर दखल, सिंघू सीमेवरून शेतकरी नेते ‘गायब’ – tractor rally violence in farmers protest signs...

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनी कृषी कायद्यांविरोधात ( farmers protest ) शेतकरी ट्रॅक्टर परेडमध्ये ( tractor rally ) मंगळवारी हिंसाचार झाला. शेतकरी आंदोलनकर्त्यांनी बॅरिकेड...

R. Ashwin: टीम इंडियामध्ये लागलं मोठं चॅलेंज, पुजाराने ‘ही’ गोष्ट केल्यावर अश्विन अर्धी मिशी ठेवणार – ind vs eng : indian cricketer r. ashwin...

नवी दिल्ली, IND vs ENG : भारतीय संघामध्ये सध्याच्या घडीला एक मोठं चॅलेंज लागलेलं आहे. हे चॅलेंज भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने भरवश्याचा फलंदाज...

Recent Comments