Home देश ladakh mp jamyang namgyal: अक्साई चीन परत मिळवणं कठीण, पण अशक्य नाही...

ladakh mp jamyang namgyal: अक्साई चीन परत मिळवणं कठीण, पण अशक्य नाही : जामयांग नामग्याल – this is the time to take aksai chin back from china : ladakh mp jamyang namgyal


नवी दिल्ली : पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत – चीन सैनिकांदरम्यान झालेल्या हिंसक झडपेनंतर सीमेवर तणाव कायम आहे. याच दरम्यान भारतीय जनता पक्षाचे लडाखचे खासदार जामयांग नामग्याल यांनी ‘अक्साई चीन’बद्दल सूचक वक्तव्य केलंय. ‘चीनकडून अक्साई चीनचा भाग परत मिळवण्याची वेळ आलीय’ असं नामग्याल यांनी एका वाहिनीशी बोलताना म्हटलंय.

‘२०२० मध्ये केंद्रात जे सरकार आहे ते १९६२ चं सरकार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलतात ते करून दाखवतात’, असंही भाजप नेते नामग्याल यांनी म्हटलंय.

देशाच्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, असं पाकिस्तानात करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईक करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं. आता पुन्हा एकदा ‘देशाच्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही’ हेच वक्तव्य पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा केलंय. केंद्र सरकारनं काय करावं, हे सरकारनं अगोदरच निश्चित केलंय, असंही जामयांग नामग्याल यांनी म्हटलंय.

वाचा :india-china clash: चीनी हल्ला पूर्वनियोजित होता; सरकार झोपेत होते- राहुल गांधींचे टीकास्त्र
वाचा :india-china clash: चीनचे काय करायचे?; पंतप्रधानांची सर्वपक्षीय बैठक आज
वाचा :Ladakh Clash: एकही भारतीय सैनिक बेपत्ता नाही, लष्कराकडून स्पष्टीकरण

सीमावादावर लडाखचे खासदार म्हणतात, भारत चीन सीमावादाचं समाधान केवळ लडाखच्या नागरिकांना नाही तर संपूर्ण भारताला हवंय. सैनिकांना गमावणं आणि सीमेजवळ राहणाऱ्या नागरिकांच्या सामान्य जीवनावर परिणाम आम्हाला नकोय. एकदाच या समस्येवर कायमचा उपाय सर्वांना हवाय. चीननं भारताच्या पाठीत एकदा नाही तर वारंवार सुरा खुपसलाय.

या भागाला अक्साई चीन यासाठी म्हटलं जातं कारण चीननं त्यावर ताबा मिळवलाय. अक्साई चीन हा भारताचा भूभाग आहे ज्याला चीननं ताब्यात घेतलंय. हा भाग परत मिळवणं कठीण आहे परंतु, अशक्य नाही, असंही जामयांग नामग्याल यांनी म्हटलंय.

यावेळी नामग्याल यांनी गलवान खोऱ्यात जीव गमावणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजलीही अर्पण केली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचंही त्यांनी म्हटलंय. उल्लेखनीय म्हणजे, सोमवारी मध्यरात्री चीनी सैनिकांसोबत झालेल्या हाणामारीत कर्नलसहीत भारताचे २० जवान शहीद झालेत.

वाचा :चिन्यांवर गोळीबार करण्याचे आदेश का दिले नाही? अमरिंदर सिंग यांचा सवाल
वाचा : पाकची नवी चाल, लडाख तणावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न
वाचा :‘मेरा सुनील अमर रहे’, हुतात्म्याला पत्नी-मुलानं दिला अंतिम निरोपSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Rajasthan Royals: IPL 2020: धोनीच्या चेन्नईची हाराकिरी, राजस्थानने साकारला मोठा विजय – ipl 2020: rajasthan royals beat chennai super kings by 7 wickets

अबुधाबी, IPL 2020 : चेन्नईच्या फलंदाजांना आजच्या सामन्यात सूर गवसला नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच चेन्नई सुपर किंग्सला राजस्थान रॉयल्सपुढे विजयासाठी १२६ धावांचे माफक...

Varun Gandhi: मदत मागणाऱ्यावर वरुण गांधी खवळले!; म्हणाले, ‘मी काय तुमचा नोकर नाही’ – bjp pilibhit mp varun gandhi viral audio illegal liquor case...

पिलीभीतः उत्तर प्रदेशमधील पिलीभीत येथील भाजप खासदार वरुण गांधी ( varun gandhi ) यांचा एक कथित ऑडिओ व्हायरल झाला आहे. या कथित व्हायरल...

Recent Comments